सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

पाटणेकर कॅपेबलच, जनतेशी नाळ जोडलेला नेता..फडणवीस*

देवेंद्र फडणवीस: डिचोलीत राजेश पाटणेकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

Snehal Joshi .
  • Jan 27 2022 5:20PM

डिचोली, दि. २७ : 
राजेश पाटणेकर हे  गोवा विधानसभा निवडणूक 2022 च्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासमोर कोणीही टिकणार नाही. सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. समाजकारण आणि राजकारण याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे, असे प्रतिपादन गोवा प्रदेशचे निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

डिचोली येथे भाजपाचे उमेदवार राजेश पाटणेकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, राजेश पाटणेकर, डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, भाजपा मंडळाचे विश्वास गावकर, नगरसेवक सतिश गावकर, दीपा पळ, अर्जुन गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, मतदानाची तारीख जवळ आली आहे. राहिलेल्या दिवसात आपल्याला पूर्ण ताकदीने आणि जोमाने काम करावे लागेल. गोव्यात भाजपा भक्कमपणे उभी आहे. विरोधात अनेक पक्ष आहेत. पण त्या सर्वांचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे भाजपाला हरवणे. जनतेची सेवा किंवा राज्याचा विकास हे कोणाचेही धोरण नाही. तर केवळ भाजपाला हरवणे एवढेच त्यांचे लक्ष्य आहे. मात्र भाजपचे उद्दिष्ट सर्वसामान्य माणसाला सर्व सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांचे जीवनमान उंचावणे हे ध्येय आहे. गोरगरिबांचे आणि तळागाळातील लोकांचे भले व्हावे यासाठी भाजपा सरकार काम करत आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका जिंकणे ही केवळ एक प्रक्रिया आहे. पण हेच केवळ अंतिम उद्दिष्ट असू शकत नाही, असे ते म्हणाले.

केवळ केवळ भाजपाला हरवायचे या ईर्षेने निवडणूक लढवत असलेल्या विरोधकांना जनतेच्या कल्याणाचे देणे घेणे नाही. हे लोक निवडून आल्यास गोव्याचे लचके तोडतील. तृणमूल काँग्रेसने गोव्यात येऊन नेत्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना विकत घेण्याचा बाजार मांडला. इतरांचे एक वेळ समजून घेता येईल पण गोव्याच्या मातीत घडलेला मगो पक्ष ही तृणमूल काँग्रेसच्या भूलथापांना भुलेल, असे वाटले नव्हते. तृणमूल काँग्रेसला आपला पराभव होणार याची जाणीव झाली आहे. तर मगो पक्षाला आपण चुकीचा निर्णय घेतल्याचे लक्षात आले आहे. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगाल मध्ये घेतले धुडगूस सर्वांना माहीत आहे. तरीही मगोसारखा पक्ष त्यांच्यासोबत जात असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे. यासाठी डिचोलीवासियानी विरोधकांचा पराभव करून भापला भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन श्री फडणवीस यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, राजेश पाटणेकर दीचोलीचा आणि येथील लोकांचा विकास करण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. आणि विरोधक स्वतःचा विकास करण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. राज्य सरकारने या मतदारसंघात अनेक विकासकामे पूर्ण केली. काहींचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. उर्वरित कामे आगामी काळात केली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. डिचोली मध्ये प्रशासकीय कार्यालय उभे राहणार आहे. त्याचा आराखडा तयार आहे. भविष्य काळात ते काम ही हाती घेतले जाईल. राज्य सरकारने शहराच्या विकासासाठी नगरपालिकेला भरघोस निधी दिला. या माध्यमातून शहरात अनेक विकास प्रकल्प उभे केले. नियोजित विकासकामे आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा पाटणेकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी पाटणेकर यांना मंत्रिपद नक्कीच मिळेल. पण खाते कोणते द्यायचे हे तुमच्या हातात आहे. पतानेकर निवडून येतीलच. किती मतांनी निवडून द्यायचे ते तुम्ही ठरवायचे आहे. यावर त्यांना मिळणारे खाते ठरेल, अशी ग्वाही डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.
राजेश पाटणेकर म्हणाले, सुरुवातीला मी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. पण लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह यामुळे मी माझा निर्णय मागे घेतला आणि निवडणूक लढवण्यास तयार झालो. याबद्दल येथील जनता आणि पक्षाचा मी आभारी आहे. मतदानास काहीच दिवस उरले आहेत. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी वेळात वेळ काढून प्रचार कार्यात झोकून द्यावे. लोकांनी भाजपाला भरघोस मतांनी निवडून द्यावे यासाठी झटावे, असे आवाहन श्री. पाटणेकर यांनी केले. 

विश्वास गावकर यांनी स्वागत केले. सतिश गावकर यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. कौस्तुभ पाटणेकर यांनी आभार मानले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार