सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ३० मिनिटे चाललेल्या या बैठकीत 'एक्झिट पोल'नंतर राजकीय परिस्थितीसंबंधी सावंत यांनी पंतप्रधानांशी चर्चा केल्याचे कळतेय.

Snehal Joshi .
  • Mar 8 2022 10:57PM

देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. गुरूवारी, १० मार्चला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.पंरतु, निवडकीसाठीचे मतदार पार पडल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या अहवालानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ३० मिनिटे चाललेल्या या बैठकीत 'एक्झिट पोल'नंतर राजकीय परिस्थितीसंबंधी सावंत यांनी पंतप्रधानांशी चर्चा केल्याचे कळतेय.

पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर प्रमोद सावंत म्हणाले की, १० मार्चला निकाल लागेल आणि गोव्यात भाजप २० पेक्षा जास्त जागा जिंकेल. बहुतांश एक्झिट पोल हे गोव्यात भाजपाला अधिक जागा मिळणार, असे दर्शवत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान,भाजपला प्रादेशिक पक्षाचा पाठिंबा मिळेल,असा दावा सावंत यांनी केला. प्रादेशिक पक्षांच्या मागणीबाबत केंद्रीय नेतृत्व आपल्या संपर्कात राहणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.गरज भासल्यास आम्ही 'एमजीपी'चा आधार घेऊ शकतो, असे देखील सावंत म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार