सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर यांनी अनुभवली द-कश्मिर फाईल्‍सची दाहकता.

केवळ भारतातच नव्‍हे तर सातासमुद्रापार चर्चेत असलेला द-कश्मिर फाईल्‍स हा चित्रपट लातूरातही प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटात 1990 साली कश्मिरी पंडि‍त यांच्‍यावर झालेल्‍या अत्‍याचाराचे सत्‍य आणि वास्‍तव मांडण्‍यात आलेले आहे.चित्रपट माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर यांनी चित्रपटगृहात पाहात त्‍यांची दाहकता अनुभवली यावेळी आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍यासह शहर जिल्‍हयाचे पक्ष पदाधिकारी, मनपा नगरसेवक व बुथ प्रमुख यांचीही उपस्थिती होती. चित्रपट संपल्‍यानंतर उपस्थितांनी भारत माता की जय, वंन्‍दे मातरम या घोषणांनी चित्रपटगृह दणाणुन सोडत 90 च्‍या दशकात दहशतीला बळी पडलेल्‍यांना दोन मिनिट स्‍तब्‍ध राहून श्रध्‍दांजंली अर्पण केली.

s.ranjankar
  • Mar 21 2022 3:01PM
केवळ भारतातच नव्‍हे तर सातासमुद्रापार चर्चेत असलेला द-कश्मिर फाईल्‍स हा चित्रपट लातूरातही प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटात 1990 साली कश्मिरी पंडि‍त यांच्‍यावर झालेल्‍या अत्‍याचाराचे सत्‍य आणि वास्‍तव मांडण्‍यात आलेले आहे.हा चित्रपट माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर यांनी चित्रपटगृहात पाहात त्‍यांची दाहकता अनुभवली यावेळी आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍यासह शहर जिल्‍हयाचे पक्ष पदाधिकारी, मनपा नगरसेवक व बुथ प्रमुख यांचीही उपस्थिती होती. चित्रपट संपल्‍यानंतर उपस्थितांनी भारत माता की जय, वंन्‍दे मातरम या घोषणांनी चित्रपटगृह दणाणुन सोडत 90 च्‍या दशकात दहशतीला बळी पडलेल्‍यांना दोन मिनिट स्‍तब्‍ध राहून श्रध्‍दांजंली अर्पण केली.
विवेक अग्‍नीहोत्री दिगदर्शित व अनुपम खेर यांची मुख्‍य भूमिका असलेला द-कश्मिर फाईल्‍स या चित्रपटाची चर्चा भारतातच नव्‍हे तर संपुर्ण जग भरात होत आहे. 90 च्‍या दशकात दहशतवादयांनी कश्मिरमध्‍ये हिंदूसह कश्मिरी पंडि‍तांवर अमानुष अत्‍याचार केलेले आहेत. अनेक कश्मिरी पंडि‍ताना दहशतवादयांच्‍या दबावामुळे आणि त्‍यांच्‍या छळामुळे कश्मिर येथून स्‍थलांतरीत व्‍हावे लागले होते.याबाबत असलेले वास्‍तव आणि सत्‍य द-कश्मिर फाईल्‍सच्‍या माध्‍यमातून मांडण्‍यात आलेले आहे. हा चित्रपट देशभरात रेकॉर्डब्रेक गर्दी करीत आहे. लातूरातही हा चित्रपट प्रदर्शित झालेला असुन माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर यांनी या चित्रपटाची दाहकता अनुभवली आहे. यावेळी आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍यासह प्रदेश कार्यकारणी सदस्‍य शैलेश लाहोटी, प्रदेश भाजयुमोच्‍या सचिव प्रेरणा होनराव, शहर जिल्‍हाध्‍यक्ष गुरूनाथ मगे,मनपा गटनेते अॅड.शैलेश गोजमगुंडे, शहर महिलाध्‍यक्षा मीना भोसले यांच्‍यासह शहर जिल्‍हयाचे पक्ष पदाधिकारी, मनपा नगरसेवक , बुथ प्रमुख व कार्यकर्ते यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होते. चित्रपट संपल्‍यानंतर उपस्थितांनी दोन मिनिट स्‍तब्‍ध उभारून कश्मिरमध्‍ये बळी पडलेल्‍या नागरिकांना श्रध्‍दांजंली अर्पण केली. त्‍याच बरोबर भारत माता की जय, वंन्‍दे मातरम या घोषणांनी चित्रपटगृह दणाणुन सोडले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार