सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकर्याने बिबट्या सोबत काढली शेल्फी ..

बिबट्या सोबत नांगरनी व सेल्फी

Sudarshan MH
  • Nov 21 2020 6:08PM
 प्रतीनिधी रावसाहेब पारधी ९९७०६८५२३२)

राहुरी (अहमदनगर) : दवणगाव येथे शेतात मशागत करताना ट्रॅक्‍टरचालक शेतकऱ्यास भरदिवसा बिबट्याचे  दर्शन घडले. या बहाद्दर शेतकऱ्याने त्याच्या सहवासातच नांगरणी केली. तब्बल दीड एकर नांगरणी होईपर्यंत बिबट्या ट्रॅक्‍टरभोवती भक्ष्याच्या शोधार्थ फिरत राहिला. ट्रॅक्‍टरवरून शेतकऱ्याने मोबाईलवर "सेल्फी' घेतला. व्हिडिओ काढला. हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. 

वैभव कासार (रा. दवणगाव, ता. राहुरी) असे या धाडसी शेतकऱ्याचे नाव. ट्रॅक्‍टरद्वारे शेतात आज दुपारी नांगरणी सुरू असताना तेथे बिबट्या आला. मात्र, वैभव कासार यांनी नांगरणी सुरूच ठेवली. बिबट्या ट्रॅक्‍टरभोवती अनेक वेळा फिरला. शेजारच्या उसात जाऊन पुन्हा मोकळ्या शेतात तो येत होता. बिबट्याच्या डरकाळ्यांनी परिसर दुमदुमला. मात्र, न घाबरता वैभव यांनी मोबाईलमध्ये हा सर्व प्रकार कैद केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार