सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय अभियंता दिन उत्साहात साजरा

भारतीय अभियंता भारतरत्न डॉ . मोक्षगुंडम विश्वेशरैया यांचा जन्म दिवस १९६८ पासून भारतीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो

Abhimanyu
  • Sep 15 2022 10:14PM
परळी :  दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांना थोर आणि आदर्श व्यक्तींच्या जीवनाविषयी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंची माहिती मिळावी या उद्देशाने दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल अनेक उपक्रमांत साध्य करत असते . 
 

  इंजिनियर्सचा प्रत्येक क्षेत्रात मोलाचा वाटा आहे त्यामुळे प्रत्येक इंजिनियरच्या स्मरणार्थ इंजिनियर दिवस साजरा करणे गरजेचे आहे . याच उद्देशाने भारत सरकारने १५ सप्टेंबर हा दिन राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो . 
 
        भारतीय अभियंता भारतरत्न डॉ . मोक्षगुंडम विश्वेशरैया यांचा जन्म दिवस १९६८ पासून भारतीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो . बांध जलाशय आणि जलविद्युत परियोजना या क्षेत्रातील कार्याचा समावेश होतो . 
  
    आज यानिमित्ताने आमच्या शाळेत विविध स्पर्धाचे उपक्रमांचे आयोजन केले होते त्यामध्ये वादविवाद , निबंध लेखन , विज्ञान प्रदर्शन ईत्यादी 

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपने सहभाग नोंदवला .  यामध्ये प्रदूषण मुक्त वातावरण , जलविद्युत , वायुविद्युत , जलशुद्धीकरण , ATM , वाहतूकीचे नियम , अपघात व्यवस्थापण , अशे अनेक विविध प्रकल्प विद्यार्थी शास्त्रज्ञानी बनवले होते .
  
दरवर्षी या दिवशी विविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या शोधक वृत्तीला वाव मिळावा त्यांच्या मध्ये शोधक वृत्ती निर्माण होऊन शोधक वृत्तीला एक व्यासपीट मिळावा या उद्देशाने विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती . उषा किरणकुमार गित्ते यांनी अभियांत्रिकी संसाधनाचे आयोजन केल्याबदल स्कूलचे मुख्याध्यापक श्री . विठ्ठल तुपे सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार