मुंबई: उबाठा गटाचे घाटकोपर भटवाडी येथील प्रभाग क्रमांक १२८ चे माजी नगरसेवक दीपक हांडे आणि माजी नगरसेविका सौ.अश्विनी हांडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यासोबतच उबाठा गटाच्या वसई - नालासोपारा महिला संपर्क प्रमुख भारती गावकर यांनीही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यासोबतच उपशाखाप्रमुख राजूभाई शिर्सेकर, हसमुख महाराज रावल, रमाकांत झगडे, रोहित बोऱ्हाडे, अमोल गाढवे, राकेश बोढेकर, युवा सेना अधिकारी संतोष मोरे, चंद्रकांत कुंजीर आशा असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही पक्षप्रवेश झाला.
यावेळी बोलताना, मुंबई स्वच्छ आणि सुंदर व्हावी यासाठी संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले असून संपूर्ण शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेत मी स्वतः सहभागी होत असून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय आम्ही घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच होईल. घाटकोपर येथील भटवाडी परिसरातील अनेक विकासकामे प्रलंबित असल्याची मला पूर्ण कल्पना आहे. ही विकासकामे पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिले जाणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना सचिव सुशांत शेलार आणि शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.