सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राजगुरुनगर प्रांत कार्यालयाबाहेर विविध प्रश्नांबाबत धरणे साखळी आंदोलन

कार्यालयाबाहेर विविध प्रश्नांबाबत धरणे साखळी आंदोलन

Sudarshan MH
  • Nov 19 2020 8:24PM
 
 
प्रतिनिधी दिपक चव्हाण पुणे
 
खेड तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) राजगुरुनगर येथील प्रांत कार्यालयाबाहेर विविध प्रश्नांबाबत धरणे साखळी आंदोलन करण्यात आले. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर गौनखनिज उत्खनन चालू आहे. त्यातील काही ठिकाणी पंचनामे होऊनही दंडात्मक कारवाई होत नाही. खेड घाट बाह्यवळण येथे संगनमताने कामे चालू आहेत. त्यात महसूल विभागाची कारवाई संशयास्पद आहे. त्यामुळे आजपासून बेमुदत आंदोलन सुरू केले.
 
आंदोलना दरम्यान उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र काही ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला असून उद्याही आंदोलन सुरूच राहणार आहे. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, तालुका अध्यक्ष देवानंद बवले, कोषाध्यक्ष अवधूत प्रसादे, सहसंघटक विठ्ठल दौंडकर, बबन गावडे, धनंजय देव्हरकर, अक्षता कान्हूरकर, उज्वला शेटे, संगिता मायदेव आदी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार