सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर - मुख्यमंत्री

पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ‘नीति आयोगाच्या नियाम परिषदेच्या’ सातव्या बैठकीत मुख्यमंत्री श्री शिंदे सहभागी झाले होते

Abhimanyu
  • Aug 8 2022 10:10AM
नवी दिल्ली: पीक विविधीकरण, सिंचन व्यवस्था बळकटीकरण,शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक शेतीबरोबरच सेंद्रीय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आदींच्या माध्यमातून राज्यातील कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यावर राज्याचा भर असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीति आयोगाच्या बैठकीत सांगितले.

           पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ‘नीति आयोगाच्या नियाम परिषदेच्या’ सातव्या बैठकीत मुख्यमंत्री श्री शिंदे सहभागी झाले होते, या बैठकीविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपील पाटील , खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, धैर्यशिल माने उपस्थित होते.  

         मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, राज्यातील पडीक जमीन बागायती शेती खाली आणण्यासाठी राज्य शासनबाप्रयत्नरत आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील चार लाख हेक्टर अन्य व पडीक जमीन बागायती शेती खाली  आणण्यात आली आहे. एकात्मीक बागायती विकास मिशन अंतर्गत (एम.आय.डी.एच) २०१५ मध्ये करण्यात आलेले नियम कायम असल्याने  बागायती शेती विकासास अडसर निर्माण होत असून या मानदंडावर पुर्नविचार करण्यात यावा, अशी सूचनाही श्री. शिंदे यांनी या बैठकीत केली.

राज्यातील जमीन सिंचनाखाली आणण्यात जलयुक्त शिवार योजना सहाय्यभूत ठरली असून या योजनेमुळे  डाळ व कडधान्य वर्गीय पिकांचे उत्पादन वाढले आहे. राज्यसरकार या योजनेस प्रोत्साहन देणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी बैठकीत सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार