सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क

'जेएन-वन’ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आरोग्य यंत्रणा, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

Shruti Patil
  • Dec 22 2023 9:26AM

'जेएन-वन’ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आरोग्य यंत्रणा, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदी सहभागी झाले होते.

सध्या राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स, ९ हजार ५०० आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. ऑक्सिजन प्लँट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाइपलाइन्स, आरटीपीसीआर लॅब सुस्थितीत आहेत का, याची तपासणी करावी. लसीकरणाच्या दृष्टीने तयारी ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार