सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गरीब, मध्यमवर्गीय शेतकर्‍यांना आर्थिक पॅकेज द्यावे : बावनकुळे

सहा महिन्यात राज्यातील गरीब व मध्यमवर्गीय असलेल्या 1074 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Snehal Joshi .
  • Aug 9 2020 3:52PM
कोरोनाच्या संसर्गाने राज्यातील शेतकर्‍याचे कंबरडे मोडले असून आर्थिक परिस्थितीमुळे डबघाईस आल्याने गेल्या सहा महिन्यात राज्यातील गरीब व मध्यमवर्गीय असलेल्या 1074 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या केलेल्या या शेतकर्‍यांचा महाविकास आघाडी सरकारवर  रोष असूनशेतकर्‍यांपर्यंत कोणतीही मदत न पोहोचल्यामुळे व कोणतेही आर्थिक पॅकेज घोषित न झाल्यामुळे आत्महत्यांच्या या घटना घडल्याचे माजी पालकमंत्री व भाजपाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
जानेवारी ते जून या 6 महिन्यात सरासरी दररोज सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा सर्वाधिक फटका राज्यातील शेतकर्‍यांना बसला आहे. विशेषत: फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. शेतकर्‍यांच्या मालाची नासाडी झाली. यासाठीच फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक पॅकेज द्यावे व आर्थिक संकटातून बाहेर काढावे अशी मागणी करीत बावनकुळे म्हणाले- जानेवारी ते जून दरम्यान झालेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये जूनमध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे मालाची वाहतूक थांबली. किरकोळ बाजारात भाजीचे भाव कोसळले. त्यामुळे शेतकर्‍यासमोर आर्थिक संकट कोसळले. पण मदत कुठूनच मिळाली नाही. परिणामी शेतकर्‍यासमोर आर्थिक संकट उभे राहिले.
मागील वर्षी मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झाला. पुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातल पिके नष्ट झाली होती. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकर्‍यावरील इतर ताण वाढला व  शेतकरी नागवला गेला. या सर्व स्थितीचा विचार करता गरीब व मध्यमवर्गीय शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आर्थिक पॅकेज घोषित करावे अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार