सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

५८ मोर्चे शांततेत निघाले ना... मग आता जाळपोळ कशाला? बसा एकत्र आणि सोडवा प्रश्न ना - छगन भुजबळ

महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी, जनतेच्या विकासासाठी महायुतीत सहभागी झालो - छगन भुजबळ

Shruti Patil
  • Dec 1 2023 7:48PM
कर्जत (रायगड): राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष ९९ मध्ये स्थापन झाला. या पक्षाचा पहिला प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होता असे सांगतानाच शाहू - फुले - आंबेडकर यांच्या विचारासोबत जाऊन काम करणार आहोत. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत सत्तेत आम्ही गेलो त्याअगोदर उध्दव ठाकरे यांच्यासोबत आम्ही गेलो म्हणजे आमची विचारधारा बदलली का? भाजपसोबत गेलो तर राग का येतो? असा सवालही छगन भुजबळ यांनी केला. 
 
महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी, जनतेच्या विकासासाठी महायुतीत सहभागी झालो. अडचणीचे प्रश्न एकत्र बसून सोडवत आहोत. न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. यामध्ये आपण निश्चित विजयी होऊ असा विश्वासही छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
 
अडचणीत आलेल्या लोकांसाठी काम करायचे आहे. राजकारणातील विरोधक आहोत .शत्रू तर नाही ना ...मग शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे असे सांगतानाच जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे तरच आपले स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्व घटकांना सोबत घ्यावे लागणार आहे. सर्वसमावेशक मंत्रीमंडळ आहे असेही छगन भुजबळ म्हणाले. 
 
भुजबळ जे बोलतात तर काय बोलतात तर अजितदादा बोलतात, फडणवीस बोलतात तेच बोलतात... दुसर्‍याच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे मात्र वेगवेगळे अर्थ काढून षडयंत्र कुणाचे सुरू आहे. आमच्या आमदारांची घरे जाळली गेली... ५८ मोर्चे शांततेत निघाले ना... मग आता जाळपोळ कशाला... बसा एकत्र आणि सोडवा प्रश्न ना... सर्वांना एकत्र बोलवा आणि सांगा... कायदा हातात घेऊन काही करु नका... सरकारला वेठीस धरु नका... त्यात जनतेला वेठीस धरले जाते हे लक्षात घ्या असेही छगन भुजबळ म्हणाले.
 
राज्यकर्ते सर्वांचे असतात म्हणून सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे. मात्र अन्याय होत असेल तर आवाजही उठवला पाहिजे. राज्यात शांतता राहिली पाहिजे.. उद्योगधंदे आले पाहिजे. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, यशवंतराव चव्हाण यांचा आहे त्यामुळे सर्वांना पुढे घेऊन जात आहोत असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. 
 
ओबीसी जनगणना व्हावी ही मागणी केली आहे. एक राज्य करते तर सगळ्या राज्यांनीही केली पाहिजे. प्रसंगाला तोंड दिले पाहिजे. आपल्याला जुन्या मित्रांसोबत आता लढाई करावी लागत आहे असे सांगतानाच 'न पुच्छो मेरी मंजिल कहा है अभी तो सफर की शुरुवात की है'... हे शेर ऐकवत छगन भुजबळ यांनी भाषणाची सांगता केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार