सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मिंथुर येथे विकास कामांचे भुमीपुजन संपन्न...

जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या प्रयत्नांमुळे मिंथुर येथे विविध विकास कामांना मंजुरी प्रदान ...गाववासियांना दिलेला शब्द पुर्ण होत असल्याचा आनंद आहे

Snehal Joshi .
  • Oct 6 2020 1:11PM
कोरोनाच्या संकटामुळे विकास कामांवर परिणाम झाला असला तरी मंजुर विकासकामे थांबता कामा नये अशी भुमिका असल्याचे प्रतिपादन नागभीड तालुक्यातील मिंथुर येथे खनिज निधीतुन मंजुर विकास कामांचे भुमीपुजन प्रसंगी जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी केले. माजी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पारडी - मिंडाळा- बाळापूर जि.प.क्षेत्रासाठी वर्षभरापुर्वी १ कोटी ७४ लक्ष रु.च्या खनिज विकास निधीला संजय गजपुरे यांच्या मागणीनुसार मंजुरी दिली होती. दरम्यानच्या काळात आता सर्व निविदा प्रक्रिया पुर्ण होउन सदर कामांचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाले आहेत. मिंथुर येथे स्मशानभूमी कडे जाणाऱ्या सिमेंट रस्ता बांधकामासाठी १० लक्ष रु., मंगलमूर्ती गजपुरे यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या सिमेंट रस्ता बांधकामासाठी ५ लक्ष रु. तर गुरुदेव मंदिराच्या सभागृह बांधकामासाठी १० लक्ष रु. उपरोक्त खनिज निधीतुन मंजुर झाले आहेत. यापैकी सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमीपुजन सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मणराव गजपुरे व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी विधिवत पुजन करुन केले. संजय गजपुरे यांनी आपल्या कार्यकाळात मिंथुर येथे पाणीपुरवठा योजनेसाठी खनिज निधीतुन ३५ लक्ष रु., जिल्हा निधीतुन जि.प.प्राथमिक शाळेसाठी नवीन वर्गखोलीचे बांधकाम, मानवविकास निधीतुन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भोजन शेड चे बांधकाम , एमआरईजीस निधीतुन २ नवीन आंगणवाडी इमारत बांधकाम , मिंथुर येथील आरोग्य उपकेंद्राचे दुरुस्तीसाठी ५ लक्ष रु.,सिंचन विभागामार्फत २ प्लग बंधारे , जिल्हा निधीतुन ग्रामपंचायत ला स्पिकर संच व ट्राँली स्पिकर बाॅक्स , मिंथुर ते खैरीचक रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी २० लक्ष रु. मंजुर करुन गाववासियांना दिलेला प्रत्येक शब्द पुर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.हा सर्व निधी मंजुर केल्याबद्दल माजी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार , जि.प.चे माजी अध्यक्ष देवरावजी भोंगळे , विद्यमान जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले यांचे संजय गजपुरे यांनी आभार मानले आहे. यावेळी सरपंच नंदकिशोर करकाडे यांनी मिंथुर गावातील विविध कामांसाठी विकासनिधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल संजय गजपुरे यांचे गाववासीयांतर्फे आभार मानले तसेच नवीन ग्रामपंचायत भवन बांधकाम व शिवमंदिर परिसराचे सौंदर्यीकरण मंजुरीसाठी आग्रही मागणी केली. या भुमीपुजन प्रसंगी मिंथुर चे सरपंच नंदकिशोर करकाडे , ग्रामपंचायत सदस्य फकिरा मेश्राम , सौ.सुनिता गजपुरे व सौ.अल्का आलबनकर तसेच डॉ. जीवन तलमले , रविंद्र गजपुरे , उमेद अभियानाच्या क्लस्टर कोआर्डिनेटर सौ.ज्योती गजपुरे व गावकऱ्यांची उपस्थिती होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार