सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आ. पवार यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

मुरूड येथे दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन औशाचे आमदार अभिमन्यू पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदरील पूर्णाकृती पुतळा मुरुड याठिकाणी व्हावा अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची जनतेची मागणी होती.ते काम आता प्रत्यक्षात सुरू होत आहे.

S.n.ranjankar
  • Nov 27 2021 5:55PM
मुरूड येथे दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन औशाचे आमदार अभिमन्यू पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदरील पूर्णाकृती पुतळा मुरुड याठिकाणी व्हावा अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची जनतेची मागणी होती.ते काम आता प्रत्यक्षात सुरू होत आहे. या भूमीपूजन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून परम पूज्य भिक्खू पय्यानंद व परम पूज्य भिक्खू सुमेध नागसेन तसेच सरपंच  अभयसिंह नाडे, जि.प. सदस्य दिलीप नाडे, उपसरपंच आकाश कनसे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत नागटिळक, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, पंकज काटे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख बी.आर. डोंगरे, भाजप तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, शहराध्यक्ष  वैभव सापसोड, शिवसेना तालुका उपप्रमुख विष्णुपंत घुटे, विजय जाधव, तालुका महामंत्री अनंत कनसे, संचालक अमर मोरे, नगरसेवक नितीन वाघमारे, संतोष ओव्हाळ, अ‍ॅड गायकवाड़, बालाजी डूटाळ, कार्यकारी अभियंता स्वामी, पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष महेश सुरवसे, उपाध्यक्ष भालचंद्र ढावारे, सचिव गौतम लांडगे, कोषाध्यक्ष बाबासाहेब टिळक, बुद्धीष्ट चॅरिटेबल ट्रस्ट व पूर्णाकृती पुतळा समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की मुरुड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी मुरुड व परिसरातील जनतेची अनेक वर्षांपासून मागणी होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सर्व प्रशासकीय अडसर दूर करून मुरुडकरांच्या मागणीला मान्यता देण्यात आली. मध्यंतरी राज्यात सत्तांतर झाले आणि कोरोनाचे भीषण संकट आल्याने निधी उपलब्ध होऊ शकला नाही. भौगोलिकदृष्ट्या हे काम  मतदारसंघाबाहेरील असले तरी हे काम माझ्या हृदयातील असल्याने माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच होता. डाॅ. बाबासाहेब बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम प्रत्यक्षात सुरु होत आहे. याचा मनस्वी आनंद आहे तसेच भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली हे माझे परम भाग्य आहे.असे सांगून ते पुढे म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार  बाबासाहेबांचे जन्मस्थळ महू (मध्य प्रदेश), दादर येथील चैत्यभूमी, आंबवडे (जिल्हा रत्नागिरी) हे मूळ गाव, नागपूर येथील दीक्षाभूमी व दिल्लीतील २६ अलीपूर रोड ही ठिकाणे पंचतीर्थ स्थळे म्हणून विकसित करत असल्याची तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पावन झालेल्या देशातील महत्वपूर्ण ठिकाणांचा बुद्ध सर्किट प्रोजेक्ट अंतर्गत सर्वांगीण विकास करत असल्याची माहिती दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार