सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

घरकुलाची रक्कम मिळण्यासाठी लाभार्थ्यांचे उमरखेड नगरपरिषद समोर उपोषण

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे मागील दोन ते अडीच वर्षापासून पंतप्रधान आवास

Sudarshan MH
  • Dec 18 2020 1:35PM
 प्रतिनिधी किरण मुक्कावार
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे मागील दोन ते अडीच वर्षापासून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम करून सुद्धा उमरखेड नगर परिषदेकडून अजूनही लाभ मिळाला नसल्यामुळे उमरखेड नगर परिषद समोर लाभार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे उमरखेड नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे लाभार्थी यांचे नुकसान होत असून घर बांधकामासाठी इकडून तिकडून जमा केलेली रक्कम तसेच अतिशय गरीब अवस्थेतील जनतेने व्याजाने पैसे आणून घर बांधकाम केले परंतु उमरखेड नगर परिषद अजूनही पैसे देत नसून या लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे दिसत आहे घरकुल मंजूर होऊन बांधकामही झाले तरीही पुर्ण लाभ मिळत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून लाभार्थ्यांनी नगरपरिषद समोर उपोषण सुरू केले.
घरकुल मंजूर झाल्यानंतर मिळालेल्या पहिल्या हप्त्यात उमरखेड नगर प्रशासनाने लाभार्थ्यांची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता  लाभार्थ्यांच्या खात्यातून बेकायदेशीरपणा 29 हजार रुपये नगर प्रशासनाच्या खात्यात जमा केले व लाभार्थ्यांना त्यापासून वंचित ठेवले ही रक्कम सुद्धा वापस मिळावी याकरिता लाभार्थ्यांनी उमरखेड नगर परिषद समोर सुरू केले असून जो पर्यंत पैसे मिळत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवु असा इशारा उपोषण कर्ते संजय चेके,परसराम राठोड, सचिन पिंजरकर व संगीता गाडगे यांनी दिला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार