सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चाळीस किलो चांदीची शिळा पंतप्रधान अर्पण करणार रामरायाला*

श्रीरामजन्मभभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास हे मणिरामदास शिबिराच्या वतीने ही शिळा पंतप्रधानांच्या हस्ते श्रीरामांना समर्पित करणार आहेत.

Snehal Joshi .
  • Jul 21 2020 8:46PM
अयोध्येतील  राममंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे आता हे स्पष्ट झाले आहे. यावेळी त्यांच्याहस्ते ४० किलो चांदीची शिळा अर्पण केली जाणार आहे. श्रीरामजन्मभभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास हे मणिरामदास शिबिराच्या वतीने ही शिळा पंतप्रधानांच्या हस्ते श्रीरामांना समर्पित करणार आहेत. महंत नृत्यगोपाल दास यांनी याबाबतची माहिती दिली. मणिरामदास स्वामी सेवा मंडळ नेहमी धार्मिक सांस्कृतिक परंपरा जपण्याचे काम करीत असते. संतांची सेवा, गोसेवा आणि निराधार विद्यार्थ्यांचे संगोपन अशी अनेक कामे या मंडळातर्फे केली जातात १९८९ मध्ये काही रामभक्तांनी एक शिळा आणि सव्वा रुपयाचे दान मंदिरासाठी दिले होते. अनेकांनी आपल्या इच्छेनुसार शक्य असेल तेवढा निधी दिला आहे. मी न्यासाचा अध्यक्ष राहिलो आहे. सध्या मी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र मंडळाचाही अध्यक्ष आहे, त्यामुळे या महायज्ञात आपल्यावतीने समर्पण करण्याची जबाबदारी आम्ही या शिळेच्या स्वरूपात पार पाडत आहोत, असे त्यांनी सांगितले. अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. या सोहळ्यात पंतप्रधानांनी उपस्थित राहावे, ही आमची विनंती त्यांनी मान्य केली आहे.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार