सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 10 हजार बेडची उपलब्धता-पालकमंत्री अमित देशमुख

जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 75 व्या स्वातंत्र दिनानिमित्त जिल्ह्यातील शहीद जवान लोभे यांच्या कुटूंबियांना शासनाच्यावतीने अर्थिक मदत देण्यात आली 50 लक्ष रुपयांचा धनादेश विरपत्नी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना 4 लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला. देशावर आलेले अस्मानी कोरोनाचे संकट लक्षात घेऊन जिल्ह्यात 6 लक्ष नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेली माहिती यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली. शेतकऱ्यांना वेळोवेळी समृद्ध करण्याच्याया सर्व उपाययोजना शासन स्तरावर करण्यात येत आहेत याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन देशमुख यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल महापालिका आयुक्त मित्तल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक हिम्मत जाधव महापौर विक्रांत गोजमगुंडे चंद्रकांत बिराजदार यासह अन्य मान्यवर उपस्थित

s.ranjankar
  • Aug 15 2021 1:07PM
लातूर:कोविडच्या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यात शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये 18 समर्पित रुग्णालये, 93 समर्पित आरोग्य केंद्रे तसेच 54 समर्पित केअर सेंटर स्थापन करून 10 हजार बेडची क्षमता निर्माण केली आहे. तसेच कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी 120 मेट्रिक टन क्षमतेचे लिक्विड टॅंक निर्माण करण्यात येत आहेत. ऑक्सिजन निर्मितीसाठी 7 ठिकाणी पी.एस.ए. संच बसविण्यात येत असून कोविडच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाची सज्जता झाली असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा आयुक्त अमन मित्तल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, हिम्मत जाधव, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी(सा.) गणेश महाडिक यांच्यासह अन्न विभागाचे विभाग प्रमुख, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी, पत्रकार व अन्य मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
    पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, आज पासून आपल्या राज्यात महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे. विकेल ते पिकेल या अभियानाद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प असणार आहे. शेतकऱ्याला स्वत: पिकांची नोंद करता येणार असून शेतीसाठी पीक कर्ज आणि पीक विमा सुलभरित्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. अलीकडेच या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेले असून हा ई-पीक पाहणी मोबाईल अँप प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असून देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असे त्यांनी सांगितले.
      विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोरोना च्या पार्श्वभूमीवर 2 हजार लिटर प्रति मिनिट क्षमतेचा अक्सिजन निर्मिती प्लांट लवकरच सुरू केला जाणार आहे. तसेच कोविड-19 गंभीर रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित राहण्यासाठी रुग्णालय परिसरात 20 हजार लिटर क्षमतेच्या दोन प्लांटना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे भविष्यात लातूर जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, अशी माहिती पालकमंत्री देशमुख यांनी दिली.
   जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये कोविड लसीकरण सुरू असून खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. दिनांक 9 ऑगस्ट 2021 अखेर जिल्ह्यात एकूण 6 लाख लाभार्थ्यांना कोविडचा पहिला डोस तर 1 लाख 90 हजार  लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात एकूण 7 लाख 90 हजार  लाभार्थ्यांना कोविडचे डोस देण्यात आलेले आहेत. तसेच जिल्ह्यात स्पुटनिक कंपनीची लस लवकरच उपलब्ध होणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी केले.  
    जिल्ह्यात सन 2016-17 ते सन 2020-21 या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना ग्रामीण, शबरी आवास योजना ग्रामीण, पारधी आवास योजना ग्रामीण व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना याद्वारे 26 हजार  घरकुले मंजूर करण्यात आली. त्यापैकी 19 हजार घरकुले पूर्ण झालेली आहेत. शासनाच्या या योजनेमुळे गरजू लाभार्थ्याचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. तसेच लातूर शहरातील शासकीय वसाहत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये राज्यातील पहिले दिव्यांगासाठी विविध थेरेपी सेंटरची स्थापना करण्यात आलेली असून यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजने मधून 60 लाखाचा निधी देण्यात आला आहे. तसेच अनुसूचित जातीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत लातूर महापालिकेच्या वतीने मागासवर्गीय स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनी बसवण्यात आल्याची माहिती पालकमंत्री देशमुख यांनी दिली.
      लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा हप्ता बँकेच्या शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत गावातच जमा करून राज्यात उल्लेखनीय काम केलेले आहे. मुदतीअखेर 6 लाख 96 हजार 983 शेतकऱ्यांचा 32 कोटीचा विमा हप्ता भरून घेऊन कोविड च्या काळात शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. अनुसूचित जातीच्या महिला अथवा पुरुष बचत गटांना स्वयंरोजगारासाठी 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर देण्याची योजना असून या योजने अंतर्गत सन 2019-20 मध्ये जिल्ह्यातील 75 बचत गटांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यातून या बचत गटांमधील सदस्यांना आर्थिक स्वावलंबन मिळण्यास मदत होणार असल्याने ही योजना या गटासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली आहे, असे देशमुख यांनी सांगितले. 
      विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण मिळावे व प्रत्येक कृतीतून विविध विषयाच्या संकल्पना समजून घ्याव्यात यासाठी बाला हा अभिनव उपक्रम राबविला जात असून जिल्ह्यातील 500 शाळा यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. हा एक अत्यंत चांगला उपक्रम शिक्षण विभाग राबवित असून त्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल. तसेच आपण स्वातंत्र्याचा 75 वा स्वातंत्र्य दिन हा आझादी का महोत्सव म्हणून 15 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत साजरा करणार आहोत. हा उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.
      अनेक थोर नेत्यांनी या स्वतंत्र भारतातील लोकशाही व्यवस्थेची मजबूत पायाभरणी केली. त्यांच्यासह इतर अनेक महनीय नेत्यांना स्वतंत्र भारताचे स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी मोठा लढा दयावा लागला तर अनेकांना आपल्या प्राणांची आहुती दयावी लागली.त्या सर्व महान नेत्यांना व स्वातंत्र्य सेनानींना याप्रसंगी विनम्रपूर्वक अभिवादन करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता श्री. देशमुख यांनी व्यक्त केली.
       प्रारंभी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ठीक नऊ वाजून पाच मिनिटांनी करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते विविध शासकीय विभागांचे पुरस्काराचे वितरण तसेच लाभार्थ्यांना शासकीय मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री देशमुख यांनी या समारंभास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार व नागरिक यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या समारंभाचे सूत्रसंचालन संवाद तज्ञ उद्धव फड यांनी केले.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार