सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वैनगंगा नदीपात्रात दाम्पत्याची मुलीसह सामुहिक आत्महत्या

नागपूर आंभोरा येथील वैनगंगा नदी पात्रातील बॅक वाॅटरमध्ये वाठोडा येथील

Snehal Joshi. MH
  • Feb 1 2021 6:50AM
 
नागपूर आंभोरा येथील वैनगंगा नदी पात्रातील बॅक वाॅटरमध्ये वाठोडा येथील एका दाम्पत्याने मुलीसह सामुहिक आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. श्याम गजानन नारनवरे (वय ४६), सवीता श्याम नारनवरे (वय ३५) व कु. समिता उर्फ समीक्षा श्याम नारनवरे (वय १२) अशी तीनही मृतकांची नावे आहे. हे दाम्पत्य वाठोडा येथील अनमोल नगरचे रहिवासी होते. श्याम नारनवरे हे संत जगनाडे महाराज कोआॅपरेटीव्ह सोसायटीत रोखपाल असल्याचे समोर आले आहे.
 
वैनगंगा नदी पात्रात रवीवारी सकाळी ७.३० वाजता ढिवर समाजाचे लोक मासेमारी करण्यासाठी गेले असता पुलावर त्यांना एक मोटरसायकल उभी दिसली. या मोटरसायकलला एक जॅकेट, एक लेडीज शाल व स्वेटर लटकलेले होते. तर गाडीच्या बाजूला कठड्यावर लेडीज चप्पल दिसली. ढिवरांनी पोलिस पाटलांना माहिती दिल्यानंतर त्यांनी वेलतूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ढिवरांच्या मदतीने शोधाशोध सुरू केली असता दुपारी दीडच्या सुमारास आई व मुलीचा तर दोन वाजताच्या सुमारास वडीलांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आईचे हात मुलीच्या कंबरेला ओढणीने बांधलेले होते. तर वडीलांचेही हात बांधलेले होते.   
 
या प्रकरणी मृतक श्याम नारनवरे यांची बहिण ज्योती संजय धरत हीच्या तक्रारीवरून वेलतूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूचे कारण अजून कळू शकले नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार