सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लैंगिक समानतेच्या गप्पा व कम्युनिस्ट पक्षातील शून्य महिला नेतृत्व*

लैंगिक समानतेवर जगभरात आंदोलने करणार्या कम्युनिस्टांच्या 'कथनी' व ' करनी' मधील मोठा आंतरराष्ट्रीय फरक या निमित्याने अधोरेखित होतो. *कम्युनिस्टांनीच दिली मार्क्सच्या लैंगिक समानतेच्या विचारांना मूठमाती*

*माधुरी साकुळकर* ९८५०३६९२३३
  • Nov 2 2020 11:14PM
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या म्हणजेच सीपीसी च्या एकूण ८९.४ मिलीयन सदस्यांपैकी २३ मिलियन स्त्रिया आहेत. म्हणजे 26 टक्के स्त्रिया सदस्य आहेत पण तरिही चीनमध्ये सत्तेच्या केंद्रस्थानी एकही महिला नाही. चायनीज नॅशनल काँग्रेस मध्ये सुद्धा स्त्रिया नाहीत. भारत, पाकिस्तान किंवा बांगलादेश मध्ये सुद्धा देशाची सत्ता महिला नेत्या सांभाळू शकल्या. पण तथाकथित साम्यवादी देशात हे घडू शकलेले नाही. लैंगिक समानतेवर जगभरात आंदोलने करणार्या कम्युनिस्टांच्या 'कथनी' व ' करनी' मधील मोठा आंतरराष्ट्रीय फरक या निमित्याने अधोरेखित होतो. *कम्युनिस्टांनीच दिली मार्क्सच्या लैंगिक समानतेच्या विचारांना मूठमाती* कार्ल मार्क्स आणि फेड्रिक एंजेल्स यांनी १८४८ यावर्षी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लिहिला. तेव्हापासून कम्युनिझम या तत्त्वज्ञानाचा जन्म झाला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना २६ डिसेंबर १९२५ ला कानपूरला एम. एन. रॉय यांनी केली. क्युबा मध्ये 1925 ला फिडल कॅस्ट्रो ने कम्युनिस्ट सरकार स्थापन केलं. माओ-त्से-तुंग ने १९४९ मध्ये चीनची सत्ता आपल्या हातात घेतली आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना स्थापन केले.चीनमध्ये तेव्हापासून एकाच पार्टीची सत्ता आजपर्यंत कायम आहे. टीकाकार म्हणतात,"चीन आता कम्युनिजम सोडून भांडवलशाही कडे प्रवास करतो आहे." जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था चीन आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीचा चीन स्थायी सदस्य आहे. अभिजात मार्क्सवादी स्त्रीवादानुसार ऐतिहासिकदृष्ट्या खाजगी कंपनीच्या उदयातच स्त्रियांच्या दडपणुकीची कारणे सापडतात. म्हणून त्यांच्यामध्ये स्त्रीमुक्तीवाद हा, साम्यवादी समाज अस्तित्वात आणण्यासाठी द्यावयाच्या लढ्याचाच एक भाग आहे.भांडवलशाही अर्थव्यवस्थेत स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळ्या तऱ्हेच्या प्रश्‍नांना तोंड द्यावे लागते. त्याकरिता स्त्रियांनी एक गट म्हणून उभे राहिले पाहिजे. त्यांनी केलेल्या कुटुंबसंस्थेच्या विश्लेषणातून स्वर्गीय समाजाचा *पुरुषीवर्चस्व* हा अविभाज्य भाग आहे हे सिद्ध होऊ लागलं. भांडवलशाहीच्या उदया बरोबर स्त्रियांचे आणखी अवमूल्यन झाले. स्त्रियांचे श्रम स्वस्तात मिळवून एकूण मजुरी कमी ठेवणे ही भांडवलशाहीच्या लाभाची गोष्ट पुरुषीवर्चस्वातून साधली जाते, असे मार्क्सवादी स्त्रीवाद मांडतो. सार्वजनिक उद्योगधंद्यात स्त्रियांना स्वतंत्रपणे समान पातळीवर सहभाग घेता आला पाहिजे असा मूळ मार्क्सवादी विचार आहे. समाजवादी शासनाने बालसंगोपण, वृद्धांची देखभाल, कुटुंबात होणारे इतर अनुत्पादक कामं यांची जबाबदारी उचलली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. त्यांनी पती-पत्नीकुटुंबाचे उच्चाटण करावे असे मांडले नाही ,पण कुटुंब आर्थिक युनिट असू नये असे मत मांडले. स्वातंत्र्य म्हणजे केवळ विषम वागणुकीचा अभावच नाही तर माणुसकीचा सर्वसमावेशक व्यवहार. तत्वज्ञान चांगले असून भागत नाही, तर व्यवहारही तत्वज्ञानाधिष्ठित असावा लागतो. *कुटुंबातच पक्षाची सूत्रे* भारतातील प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे जेव्हा विविध आंदोलनात भाग घेतल्यामुळे तुरुंगात जात तेव्हा त्यांची पत्नी उषा डांगे त्यांच्या पश्चात कामगार आंदोलन चालवीत असत.नुकतेच निधन झालेल्या रोझा देशपांडे (कॉम्रेड डांगे यांची मुलगी) याही कामगार चळवळीत होत्या. सध्या वृंदा करात हे एकमेव नाव भारतातील कम्युनिस्टांजवळ आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हजारा बेगम या एकमेव कम्युनिस्ट स्त्री नेत्या होऊन गेल्या. महुआ सरकार या लेखिकेने हजारा बेगम यांच्याबद्दल बरेच लेखन केले आहे. हजारा बेगम च्या मते ए.आय.डब्ल्यू.सी. मध्ये गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की केवळ उच्चभ्रू आणि उच्चवर्णीय स्त्रियाच ही संस्था चालवित आहेत. हजारा बेगमच्या च्या मते," अशा काही गोष्टी आहेत ज्या विरुद्ध सर्व स्त्रिया बंड करू शकतात. त्यातील एक म्हणजे स्त्रियांना संपत्तीत अधिकार नाही.स्त्रिया शतकानुशतके ज्या प्रकारचे जीवन जगतात त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. राजकीय जीवनात, पक्षात सुद्धा त्या वेगळ्या पडतात. त्यांना ठराविक कामेच दिली जातात. पुरुषांच्या आधिपत्याखाली त्यांनी रहावे अशी अपेक्षा केली जाते.सर्व आर्थिक बाबतीत त्या पुरुषांवर अवलंबून राहतील असं पाहिलं जातं." राजकारण आणि महिला हा विरोधाभास आहे.भारतातील राजकारणात महिलांचा सहभाग या विषयावर *'मग भाकऱ्या कोण थापणार'* हा अहवाल प्रसिद्ध आहे. राजकारणातलं 'ग्लास सिलिंग' तोडणे स्त्रियांसाठी अवघडच नाही तर अशक्य आहे. *जे भारतीय उपखंडात शक्य ते साम्यवादी देशात कां नाही?* आपल्या मूळ एकात्म दर्शनामुळे भारतात तत्वतः स्त्री-पुरुष समानता रुजल्यामुळे अर्थात पन्नास वर्षापूर्वी इंदिरा गांधी सर्वोच्च पदावर पोहोचू शकल्या.मूळ भारताचा भाग असलेल्या बांगलादेशात आणि पाकिस्तानातही हे शक्य झालं. बेनझीर भुत्तोनी पंतप्रधान असताना मुलही जन्माला घातलं. सध्या ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान जेसिंडा साधेपणासाठी गाजताहेत. जर्मनीची आयर्न लेडी- एंजेला मार्केल विस्थापितांना जर्मनीत आश्रय देऊन जास्तीत जास्त स्थलांतरितांना सामावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. जर्मनीमुळे युरोपची आर्थिक घडी सुरळीत सुरू आहे आणि हे केवळ एंजेला मार्केल मुळेच. हे सर्व देश लोकशाहीवादी ,समाजवादी आहेत. साम्यवादी देशात रशिया, चीन आणि क्युबा मध्ये काय परिस्थिती आहे ? चीनच्या राजकारण्यांच्या मते बायकांची जागा घरात आणि स्वयंपाक घरात आहे. ज्या काही स्त्रिया राजकारणात आणि समाजकारणात होत्या त्यात माओची तिसरी बायको तसेच बिन बाओ ची बायको, अशा राजकीय नेत्यांच्याच बायका होत्या.पूर्ण सी.पी.सी. च्या इतिहासात एकही स्त्री पॉलिट ब्युरो च्या स्टॅंडिंग कमिटीमध्ये नव्हती.,तर दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त स्त्रिया राजकारणात नव्हत्या. २०१७ यावर्षी दोन डझन काळा सूटातील पुरुष आणि फक्त एक स्त्री-67 वर्षाच्या _सून चाॅलान_ युनायटेड फ्रंड वर्क डिपार्टमेंट मध्ये होत्या. शी.जिनपिंग च्या पहिल्या टर्म मध्ये 2012 मध्ये एक स्त्री होती -लाइस याॅनडाॅंग_ आणि सात सदस्यांच्या स्थायी समितीत एकही स्त्री सध्या नाही. दिवसेंदिवस स्त्रियांचे प्रतिनिधित्व कमी कमी होत चाललं आहे. सतराव्या सेंट्रल कमिटीमध्ये ८% आहे. चीनची एकच पार्टी असलेली(सीपीसी) सात सदस्यांकडून चालविल्या जाते. त्यानंतर असते ये 25 सदस्यीय पॉलिट ब्युरो स्टॅंडिंग कमिटी .आजपर्यंत पहिल्या सात जणांच्या समितीमध्ये एकही स्त्री कधीच नव्हती. 2012 च्या सेंट्रल कमिटी ककाँग्रेस मध्ये 33 स्त्रिया होत्या ज्या पॉलिट ब्युरो निवडत. 2280 सदस्यांच्या काँग्रेसमध्ये एकचतुर्थांश पेक्षाही कमी स्त्रिया होत्या, त्यामुळे काही लोक म्हणत," पार्टीने लिंगसमानता गांभीर्याने घ्यायला पाहिजे."न्यू यॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने लिहिलं,"स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सीपीसीला महिलासमस्या आहे का?" _मिल्का फ्लानिव_ या स्री ने 1980 च्या दशकात युगोस्लोव्हाकिया चे पंतप्रधान पद भूषविले. _तुवान_हे यु एस एस आर मधलं रशिया आणि मंगोलिया च्या सीमेवरचं छोटं राज्य. 1940 मध्ये _खेरटेक ऑचमा_ ह्या अध्यक्ष होत्या. रुमानियात अॅना पॉकर या परदेश मंत्री होत्या.1940 ते 1950 मध्ये पाश्‍चिमात्य भांडवलशाही देशांच्या तुलनेत कम्युनिस्ट राजकारणात स्त्रियांनी शून्य प्रगती केली. कम्युनिस्टांची ऑडिओलॉजी आदर्श आहे पण ते ढोंगी आहेत. त्यांचं वागणं वेगळंच असतं. तत्त्वज्ञान आणि व्यवहार यात फरक असल्यामुळे आणि स्टॅलिन आणि माओ च्या हुकूमशाही मुळे कदाचित स्त्रिया पुढे आल्या नसतील. बहुतेक स्त्रिया या मुळात धार्मिक असल्यामुळे_"धर्म ही अफूची गोळी" मानणाऱ्या तत्वज्ञानावर आधारलेल्या पक्षाचा अशा स्त्रिया भाग होऊ शकत नसतील. "क्रांतीचा मार्ग हा बंदुकीच्या नळीतून जातो"या हिंसेच्या तत्त्वज्ञानावर आधारित राजकीय भूमिका असणाऱ्या पक्षापासून स्त्रिया अलिप्त राहणे पसंत करतात असे वाटते. जिज्ञासूंनी कारणांचा शोध घ्यावा. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार