सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकऱ्यांना शेती अवजारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शेती अवजारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Nandurbar MH
  • Jul 29 2021 5:28PM


नंदुरबार दि.29:  केंद्र शासनाकडील मंजूर असलेल्या बीव्हीजी ॲग्री क्रॉप यिल्ड  योजनेऐवजी सन 2018-2019 या आर्थिक वर्षाकरिता शेती अवजारासाठी अर्थसहाय्य योजनेसाठी नंदुरबार, नवापूर, शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार असून इच्छुकांकडून 14 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

शेती अवजारे अर्थसहाय्यासाठी शेतकरी अनुसूचित जमातीचा असावा व वार्षिंक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे किंवा लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावा. लाभार्थ्यांकडे शेत जमीन असावी. योजनेसाठी विधवा, परितक्त्या स्त्रिया, अपंग लाभार्थी यांना प्राधान्य राहील. (तसा दाखला असणे आवश्यक राहील ) लाभार्थ्यांने यापूर्वी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याचे हमीपत्र, पासपोर्ट फोटो, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, सातबारा उतारा, रहिवाशी दाखला (स्वयंघोषणापत्र), आधारकार्ड, बँक खाते क्रमांक इत्यादी अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. ग्रामसभेचा ठराव व लाभार्थी साहित्य विक्री करणार नाही याबाबत प्रतिज्ञापत्र अर्जासोबत द्यावे लागेल.

योजनेच्या अधिक माहितीसाठी व  अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नवापूर रोड नंदुरबार येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार