सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सर्व ग्रामपंचायतींनी पुरस्कारप्राप्त असे कार्य करावे- मा. जि.प. अध्यक्ष श्रीम.भारती कामडी

. जि.प. अध्यक्ष श्रीम.भारती कामडी

Sudarshan MH
  • Feb 18 2021 10:39AM
 
पालघर - (मनीष गुप्ता) पुरस्कार प्राप्त ग्राम पंचायती नि चांगले कार्य केले असून तालुका स्तरावरील पुरस्कार घेतलेल्या ग्रामपंचायतिनी जिल्हा स्तरीय पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत,तसेच अन्य ग्राम पंचायतींनी पुरस्कार प्राप्त असे काम आपल्या ग्राम पंचायत मध्ये करावे असे आवाहन मा.जि.प.अध्यक्ष, श्रीम. भारती कामडी यांनी आज केले. आज जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागा मार्फत पालघर जिल्ह्यातील तालुका स्तरीय व जिल्हा स्तरीय निवड करण्यात आलेल्या गावांना आज आर.आर.पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आर. आर. (आबा ) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजने अंतर्गत पुस्कार देण्यात आले. नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे हा समारंभ संपन्न झाला. मा. जि.प.अध्यक्ष भारती कामडी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा.जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले , त्या वेळी त्या बोलत होत्या. तर कोरोना अद्याप पूर्ण नष्ट झाला नसून प्रत्येकाने मास्क वापरा असे आवाहन केले. 
  गाव सुंदर आणि स्मार्ट करण्यासाठी अनेक कल्पना आहेत, त्या प्रत्यक्षात राबवण्यात आल्या पाहिजेत त्यासाठी प्रशासना कडून निधी ची कमतरता भासणार नाही. सरपंचांचे प्रशिक्षण, योग्य कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त गाव असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे असे मत यावेळी मा.जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केले. मा.जि.प.उपाध्यक्ष, श्री. निलेश सांबरे यांनी तालुका व जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त विजेते हे कधीतरी महाराष्ट्र व देश पातळी वरचा पुरस्कार मिळवतील असे अभिप्रेत आहे. शासनाची प्रत्येक योजना शेवट च्या व्यक्ती प्रर्यंत पोचली पाहिजे. असे मत व्यक्त केले. 
प्रसंगी मा.सभापती, पशु संवर्धन व कृषी समिती, सुशील चुरी, मा. सभापती बांधकाम व वित्त समिती, श्री. काशिनाथ चौधरी , मा.सभापती समाजकल्याण समिती, श्री.विष्णू कडव मा.पंचायत समिती सभापती वाडा श्री. योगेश गवा,मा. पंचायत समिती सभापती, श्रीम.वसई स्नेहलता सातवी व सर्व सन्मा.जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), श्री. टी .ओ.चव्हाण यांनी प्रास्ताविक सादर केले. वेवजी, बोर्डी, हिरवे, जांबुगाव, कुर्झे या ग्रामपंचायतीना जिल्हा स्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर अन्य २५ ग्राम पंचायतीना तालुका स्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक उर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर या निकषांवर सदर ग्राम पंचायतीना हे पुरस्कार देण्यात आले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार