सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

80 कोटी जनतेला मोफत अन्न देणारी योजनेचा आणखी विस्तार

गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार रुपये जमा केले गेले, असे मोदी यावेळी म्हणाले

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 30 2020 4:23PM

देशातील कोरोनाबाधित रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक पातळीपासून सर्वांनीच अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार आता दिवाळी व छट पुजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत केला जाई. 80 कोटी जनतेला मोफत अन्न देणारी योजना नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच पुढील पाच महिने देणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. याशिवाय वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

-वेळीत लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशातील परिस्थिती स्थिर

-अनलॉकनंतर वैयक्तिक व सामाजिक परिस्थितीत दुर्लक्ष केलं आहे. ही चिंतेची बाब आहे.

-लॉकडाऊनदरम्यान गांभीर्याने नियमांचे पालन करण्यात आले होते. मात्र आता देशातील नागरिक, संस्था पुन्हा तशाच स्वरुपातील सतर्कता दाखविण्याची गरज आहे.

PM Modi Speech Live

-कंटेन्टमेंट झोनमध्ये अधिक काळजी घ्यायला हवी.

-भारतातही स्थानिक सरकारला अधिक काळजी घ्यायला हवी. भारतात गावाचा प्रधान असो की नगरसेवक सर्वांनी काळजी घ्यायला हवी.

-लाखो लोकांचं प्राण लॉकडाऊनच्या नियमांमुळे वाचले. नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांना रोखायला हवं, टोकायला हवं आणि समजवायला हवं. स्थानिक प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. नियमाच्या वर पंतप्रधानसुद्धा नाही.

-गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार रुपये जमा केले गेले.

-प्रधानमंत्री अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार नोव्हेंबरअखेरपर्यंत करण्याचा विचार आहे. दिवाळी, छठपूजा होईपर्यंत मोफत धान्य मिळेल. दर महिन्याला प्रत्येक गरीब कुटुंबातल्या  सदस्यांना प्रत्येकी पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ दर महिन्याला मिळेल

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार