सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चार अधिकाऱ्यांनी नियमबाह्य प्रमोशन घेतल्याची माहिती मिळताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली

अनिल कुमार सिंह आणि विनोद कुमार शर्मा सिनेमा ऑपरेटर आणि सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यात आली होती

Sudarshan MH
  • Jan 10 2021 12:02PM

अनेकवेळा नियमबाह्य प्रमोशन घेऊन उच्च पदावर किंवा अधिकारी पदावर जात असल्याच्या घटना पाहायला मिळतात. पण आता अशा घटनांवर चाप लावण्यासाठी मोठी कारवाई करण्यात आली आहे. चार अधिकाऱ्यांनी नियमबाह्य प्रमोशन घेतल्याची माहिती मिळताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना थेट अधिकारी पदावरून आता शिपायाची नोकरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चार अधिकाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. 3 नोव्हेंबर 2014 मध्ये 4 अधिकाऱ्यांनी नियम तोडून प्रमोशन घेतल्याची माहिती समोर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कारवाईचा बडगा उचलत त्यांना शिपायाची नोकरी करण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेशच्या सूचना विभागातील 4 अधिकाऱ्यांच्या प्रमोशनवर केलेल्या कारवाईमुळे नियम तोडून प्रमोशन मिळवणाऱ्यांवर चाप बसेल असा विश्वास योगी आदित्यनाथ सरकारला आहे. आता या अतिरिक्त जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या जागी शिपाई, ऑपरेटर आणि सहाय्यक अशा 4 जागा चार अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

 
 

मिळालेल्या माहितीनुसार 3 नोव्हेंबर 2014 रोजी नरसिंह यांची शिपाई म्हणून तर दयाशंकर यांची चौकीदार म्हणून नेमणूक झाली होती. अनिल कुमार सिंह आणि विनोद कुमार शर्मा सिनेमा ऑपरेटर आणि सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या चारही जणांनी नियम तोडून एकाच वेळी 4 पदांवर आपलं प्रमोशन करून घेतलं. याची माहिती सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कारवाई केली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार