सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चित्रपट, टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाला अनुमती

सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला.यात चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, OTT  मालिका यांच्या चित्रीकरणास काही अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे.

Snehal Joshi
  • Jun 1 2020 10:02AM

सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला.यात चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, OTT  मालिका यांच्या चित्रीकरणास काही अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे. 

 गेल्या आठवड्यात मुंबईतील  चित्रपट निर्माते, कलावंत तसेच ब्रॉड कास्टिंग फाउंडेशनचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. करोनात लावण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे चित्रपट सृष्टीत ठप्प झाली असून, चित्रकरण करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. आज या संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय  प्रसिद्ध केला असून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका,ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास काही अटी व शर्तींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे.

आता निर्मात्यांना निर्मिती पूर्वीची आणि निर्मितीनंतर ची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येईल.निर्मात्यांनी त्याप्रमाणे काळजी घेऊन चित्रीकरण करण्याचे असून नियमांचा भंग झाल्यास कामे बंद करण्यात येतील. असेही त्यात म्हटले आहे. कोविड संदर्भात लागू केलेल्या 
प्रतिबंधातील सूचना यासाठी लागू आहेत. चित्रीकरणाच्या कामासाठी निर्मात्यांना मुंबई करिता व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव येथे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी त्या त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा  लागणार आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार