सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उपमुख्यमंत्री अजित पवार बनले चेष्टेचा विषय

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कोरोनाच्या वॉररुमला भेट दिली. मात्र, महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर इंग्रजी भाषांतरात अजितदादांनी वॉररुमला नव्हे तर 'बाथरुमला' भेट दिल्याचे लिहिलं गेलं. नंतर ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.

Aishwarya Dubey
  • May 30 2020 3:06PM

पिंपरी चिंचवड, 30 मे: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कोरोनाच्या वॉररुमला भेट दिली. मात्र, महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर इंग्रजी भाषांतरात अजितदादांनी वॉररुमला नव्हे तर 'बाथरुमला' भेट दिल्याचे लिहिलं गेलं. नंतर ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.काही जणांनी या भाषांतरावर तिरकस प्रतिक्रियाही दिल्याने अजित पवार चेष्टेचा विषय बनले आहेत.

फेसबुकवर Pimpri-chinchwad municipal corportion या नावाने पिंपरी चिंचवड महापालिकेच अधिकृत पेज आहे. त्यावर महापालिकेच्या घडामोडीची माहिती टाकली जाते. कोरोना संदर्भात माहिती घेण्यासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या वॉररुमला शुक्रवारी भेट दिली. त्याबाबतची माहिती प्रशासनाने फेसबुकवर टाकली, त्यात मराठीत दिलेली माहिती बरोबर आहे. मात्र, इंग्रजीमध्ये वॉररूम ऐवजी 'बाथरुम'ला भेट दिल्याचे लिहिलं गेल्यानं एकच गोंधळ उडाला.

महापालिकेचे फेसबुक पेज देश-विदेशातील नागरिक बघतात. अजितदादांनी बाथरुमला भेट दिली, असं टाकल्यानं तो आता चेष्टेचा विषय बनला आहे. त्यामुळे महापालिकेने चूक दुरुस्त करावी आणि संबधितांवर तात्काळ कारवाईची मागणी आता विरोधकांनी केली आहे.

दरम्यान, याबाबत महापालिकेच्या अधिकृत पेजची देखरेख करणारे अधिकारी नीलकंठ पोमन यांना विचारलं असता त्यांनी आम्ही फक्त पेज ओपन करून दिलं. मात्र, त्यावर टाकण्यात येणारा मजकूर हा जनता संपर्क विभाग टाकतो, असं म्हणत आधी त्यांना जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. नंतर या बाबत स्पष्टीकरण देताना फेसबुकने परस्पर मराठी मजकुराचे इंग्रजीत ट्रान्सलेशन केलं आणि त्यामुळे वॉररूम ऐवजी बाथरूम झाले, असल्याची शक्यता वर्तवत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

मात्र महापालिकेच्या अधिकृत पेजवर फेसुबकने परस्पर केलेल्या अशा बदला बद्दल तुम्ही तक्रार केलीय काय? याबाबत ते उत्तर देऊ शकले नाही. दुसरं म्हणजे उपमुख्यमंत्री चेष्टेचा विषय बनतील, अशी घोडचूक नक्की फेसबुकच्या तांत्रिक चुकीमुळे झाली की तर पेज हॅक करून आणखी कुणी त्यावर अशी करामत केली. या बाबतही पोमन यांना नीट माहिती देता आली नाही. शेवटी हे प्रकरण गंभीर असून त्याची चौकशी केली जाणार असल्याचे सांगून इंग्रजीतील मजकूर पेज वरून काढून टाकल्याचे पोमन यांनी माहिती दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार