सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यात खाजगी रूग्णालयांमध्ये बेड्स अडवून बसलेल्या asymptotic रुग्णांना घरी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले

'मात्र असे रुग्‍ण घरी जाण्‍यास नकार देत असतील तर त्‍यांची यादी महानगर पालिका प्रशासनाकडे पाठविण्‍यात यावी'

Aishwarya Dubey
  • Jul 18 2020 10:54AM

पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून सर्वच रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटल रुग्णांनी खचाखच भरली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात जागा मिळावी, यासाठी आता कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.  पुण्यात खाजगी रूग्णालयांमध्ये बेड्स अडवून बसलेल्या asymptotic रुग्णांना घरी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

पुण्यात एकीकडे सामान्य कोरोना रुग्णांना उपचार मिळत नाहीत तर दुसरीकडे खासगी रूग्णालयांमधून अतिसौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना अकारण बेड्स अडवून बसल्याच्या तक्रारी आहेत. म्हणूनच  खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये कोरोनाबाधित म्‍हणून उपचार घेत असलेल्‍या तथापी, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्‍य लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांचे समुपदेशन करुन  त्‍यांना घरी पाठविण्‍यात यावे, असे आदेश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांनी काढले आहे.

जे रुग्‍ण कोरोनाबाधित म्‍हणून उपचार घेत आहेत आणि कोरोनाची सौम्‍य लक्षणे आहेत किंवा कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र असे रुग्‍ण घरी जाण्‍यास नकार देत असतील तर त्‍यांची यादी महानगर पालिका प्रशासनाकडे पाठविण्‍यात यावी, असंही जिल्‍हाधिकारी राम यांनी कळवले आहे.

खाजगी रुग्‍णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती घेण्‍यासाठी जिल्‍हा स्‍तरावर तपासणी पथक स्‍थापन करण्‍यात आले असून या पथकामार्फत तपासणी करण्‍यात येणार आहे. जर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले किंवा सौम्‍य लक्षणे असलेले रुग्‍ण खाजगी रुग्णालयात आढळून आले तर संबंधित रुग्‍णालयाच्‍या प्रशासनावर साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायद्यानुसार, कार्यवाही करण्‍यात येईल, असा इशाराही जिल्‍हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार