सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिंपरी चिंचवड शहरातल्या ई- कचऱ्याचे करायचे काय ?-सामान्य जनतेचा प्रश्न

ई-कचरा साफ-सफाई करणाऱ्यांच्या आरोग्यासाठी घटक असतो. ई-कचऱ्यामुळे कचरा डेपोमध्ये आगी लागण्याचा धोका असतो. काही सामाजिक संस्था ई-कचरा गोळा करण्याचे छोटे मोठे उपक्रम घेत असतात

Abhimanyu
  • Sep 16 2021 12:36PM
पुणे  : पिंपरी चिंचवड़ शहरातल्या ई- कचऱ्याचे करायचे काय ?-सामान्य जनतेचा प्रश्न
पिंपरी चिंचवड शहारत अनेक समस्या आहेत त्यात पर्यावरणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. शहरात अनेकजण उच्चशिक्षित आहेत, आयटी मध्ये कामाला आहेत. अनेकांकडे कॉम्पुटर आणि मोबाईल आहेत. पण काही कालांतराने ते बंद पडतात अशावेळी हा ई-कचरा कुठे जमा करायचा हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
त्यातच गणेशउत्सव सुरु आहे. हौशी मंडळींनी सजावटीसाठी जुन्या लाईटच्या माळा, त्याचे चार्जर, चोक, ड्राइव्हर इत्यादी वापरले तर त्यातले काही खराब झाले. त्यांचाही हा प्रश्न आहे की या खराब आणि न वापरता येणाऱ्या  ई-कचऱ्याची विल्ल्हेवाट कशी लावायची.
एवढेच काय पण घरातली ट्यूब लाईट खराब झाली तर त्याचे काय करायचे हा प्रश्न कित्येक दिवस नागरिकांना पडलेला आहे. ई-कचरा साफ-सफाई करणाऱ्यांच्या आरोग्यासाठी घटक असतो. ई-कचऱ्यामुळे कचरा डेपोमध्ये आगी लागण्याचा धोका असतो. काही सामाजिक संस्था ई-कचरा गोळा करण्याचे छोटे मोठे उपक्रम घेत असतात पण ते ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील जनतेपर्यंत पोहोचत नाहीत.
राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष माधव धनवे-पाटील यांनी शहरातील निर्माण होणार ई-कचरा कुठे जमा करायचा, त्याची विल्ल्हेवाट कशी लावायची याबाबत प्रशासनाकडून योग्य ती पाऊले उचलली जावीत यासाठी नगरपालिकेचे पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी यांना निवेदन दिले. त्या उपाय योजनांचा प्रचार प्रसार करावा ही विनंती केली.
   तसेच प्रभाग १७ मध्ये अनेक उच्चशिक्षित लोक आहेत ज्यांच्याकडे ई-कचरा तयार होतो म्हणून या भागात ई-कचरा गोळा करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी विनंती पर्यावरण विभाग प्रमुखांना करण्यात आली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार