सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दौंडमध्ये पुन्हा ८५० किलो गोमांस जप्त; २ जिहाद्यांवर गुन्हा दाखल

पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आलेल्या गोमांसाचे नमुने घेत राहिलेले गोमांस दौंड पोलिसांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले.

Sudarshan MH
  • May 6 2025 9:21AM

दौंड: दौंड शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८५० किलो गोमांस जप्त करून दोन जिहाद्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोहत्या करणाऱ्यांकडून घरासमोर राहणाऱ्या व्यक्तीच्या घरात गोमांस टाकून पळ काढण्यात आल्याचा प्रकार या कारवाई दरम्यान समोर आला आहे. दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे गोहत्या सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अंतर्गत असणाऱ्या ११२ या क्रमांकावर पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर दौंड पोलिसांचे एक पथक खाटीक गल्ली येथे दाखल झाले.

गोहत्येची माहिती मिळताच मानद पशु कल्याण अधिकारी अहिरेश्वर जगताप व त्यांचे सहकारी देखील तेथे दाखल झाले. गोहत्या करणारे जिहादी आलम शेख व अझीम शेख (दोघे रा. खाटीक गल्ली, दौंड) यांनी त्यांच्या घरासमोर राहणारे दिलीप सखाराम कांबळे यांच्या घरात गोमांस टाकून पळ काढला होता. पोलिस पथकास दिलीप कांबळे यांच्या घराची पाहणी करत असतांना त्यांना आलम शेख याच्या घरात देखील गोमांस असल्याचे आढळून आले.

फिर्यादीनुसार, आलम शेख व अझीम शेख (दोघे रा. खाटीक गल्ली, दौंड) यांच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आलेल्या गोमांसाचे नमुने घेत राहिलेले गोमांस दौंड पोलिसांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले. या कारवाईत एकूण ८५० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून त्याचे एकूण मूल्य १ लाख ५३ हजार रूपये, इतके असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार