सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकरी आंदोलनावरुन नितीन गडकरींचं मोठं विधान - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत

Aishwarya Dubey
  • Dec 15 2020 10:44AM

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमचं सरकार शेतकऱ्यांना कृषी कायदे योग्य आहेत हे पटवून देईल, समजावून सांगेल आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. नितीन गडकरी यांनी एएनआयला मुलाखत दिली असून यावेळी त्यांनी जर आपल्याला सांगितलं तर शेतकऱ्यांसोबत चर्चा करु असंही म्हटलं आहे.

“सध्याच्या घडीला कृषी आणि वाणिज्य मंत्री शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. जर मला चर्चा करण्यासाठी सांगितलं तर मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधेन,” असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

 

“जर चर्चाच नसेल तर यामुळे गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतात. जर चर्चा असेल तर तोडगा काढता येऊ शकतो आणि संपूर्ण प्रकरणच मिटेल. शेतकऱ्यांना न्याय आणि दिलासा मिळेले. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

 

नवे कृषी कायदे आणून सरकारने शेतकऱ्यांविरोधात काही केलेलं नाही असं सांगताना नितीन गडकरी यांनी सरकार शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे.

 

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार