सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सोलापुरात कांदा सात महिन्यांत पाच लाख क्विंटलची घट

सात महिन्यांत पाच लाख क्विंटलची घट

Aishwarya Dubey
  • Nov 8 2020 12:08PM

यंदाच्या वर्षांत करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यापाठोपाठ अतिवृष्टी व पुराच्या संकटामुळे सोलापूरच्या कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आवक थंडावली आहे. चालू वर्षांत एप्रिल ते ऑक्टोबपर्यंत दहा लाख ५८ हजार क्विंटल कांद्याची आवक होऊ न १२२ कोटी ४७ लाखांची उलाढाल झाली. मागील वर्षांत याच कालावधीत १५ लाख ५५५० क्विंटल कांद्याची आवक होऊ न १७९ कोटींची उलाढाल झाली होती. यंदाच्या वर्षी आतापर्यंत पाच लाख क्विंटल कांद्याची आवक घटली आणि ५७ कोटींची उलाढाल झाली नाही.

राज्यात लासलगावच्या कांदा बाजारानंतर सोलापूरचा कांदा बाजार प्रसिद्ध आहे. कांद्याची आवक आणि मिळणारा दर विचारत घेता राज्यातील अनेक जिल्ह्य़ातील कांदा उत्पादक शेतकरी सोलापुरात येऊ न कांदा विक्री करणे पसंत करतात. सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी कांद्याच्या खरेदी-विक्रीतून सातशे ते आठशे कोटींपर्यंत आर्थिक उलाढाल होते. एकूण आर्थिक उलाढालीच्या ६० ते ६५ टक्के उलाढाल कांदा खरेदी-विक्रीतून होते. गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल २०१९ ते मार्च २०२० पर्यंत सोलापुरात ४८ लाख १० हजार ५८१ क्विंटल इतकी कांदा आवक झाली होती. यात झालेली आर्थिक उलाढाल ७३८ कोटी १७ लाख ९६५० रुपये एवढी होती. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये सोलापूरच्या बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल कमाल उच्चांकी दर तब्बल २० हजार रुपयांपर्यंत मिळाला होता. कांद्याचा स्थिर दर दहा हजारांपेक्षा अधिक होता.

तथापि, यंदा मार्चपासून करोनाच्या वाटेने टाळेबंदी लागू झाली आणि सर्वच बाजारपेठांप्रमाणे कांदा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल ठप्प झाली. सुमारे ८५ दिवस कांदा लिलावच होऊ  शकला नाही. जूनमध्ये लिलाव कसाबसा सुरू झाला. पण त्यात अनेकदा अडथळे आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर अखेर रडतखडत का होईना, सुरू झालेल्या कांदा बाजारात कांदा आवकही कमी झाली आहे. यातच भर म्हणून गेल्या महिन्यात जिल्ह्य़ात व आसपासच्या भागात अतिवृष्टी व पुराचे संकट कोसळले. त्याचाही मोठा फटका कांद्याला बसला.

सोलापूर जिल्ह्य़ात अतिवृष्टीने सुमारे ३५ हजार हेक्टर कांद्याचे पीक नुकसानीत आल्याची नोंद जिल्हा कृषी विभागात झाली आहे. त्यामुळे सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आवक घटत चालली आहे. सध्या जुना कांदा बाजारात येत असून तो संपल्यानंतर नवीन कांदा येण्याची शक्यता धूसर दिसते, असे मत कांदा व्यापारी म. सादिक ऊ र्फ सत्यम बागवान यांनी व्यक्त केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार