सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईत या भागात सुरू आहे नाकाबंदी

आज मुंबई पोलिसांनी दहिसर ऐवजी बोरीवलीला नाकाबंदी केली आहे. त्यामुळे आज पुन्हा पश्चिम द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम पाहायला मिळाली.

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 30 2020 3:28PM

राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. अशात सगळ्यात जास्त कहर हा मुंबईत पाहायला मिळतो. राज्यात लॉकडाउन (Lockdown) शिथिल केल्यानंतर काही भागात पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकं वर काढलं. विषाणू संसर्ग बाधीत रुग्णं वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर या महानगर पालिका क्षेत्रात (Thane, Navi Mumbai, Kalyan-Dombivali, bhiwandi,) कोरोना संसर्ग वाढणाऱ्या विभागात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे आता मुंबईत विनाकारण येणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

मुंबईत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्याचा परिणाम पाहता मुंबई आज वर्दळ कमालीची घटली आहे. सरकारी आणि खाजगी कार्यालय कर्मचारी वगळता कोणी रस्त्यावर दिसत नाही. तर आज मुंबई पोलिसांनी दहिसर ऐवजी बोरीवलीला नाकाबंदी केली आहे. त्यामुळे आज पुन्हा पश्चिम द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम पाहायला मिळाली

मुंबई पोलिसांनी बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी अशा प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. मुंबईत विनाकारण येणारे, दुचाकी वर 2 जण प्रवास करणारे या सगळ्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्यांची चांगलीच फजीती झाली आहे. पोलिसांनी अनेकांच्या गाड्या जप्त केल्या आहेत. जोगेश्वरीला जप्त केलेल्या अनेक गाड्या हायवेवरच ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी जप्त केलेल्या 16 हजार गाड्या काही पोलीस स्टेशनला आहेत तर काही रस्त्याच्या कडेलाच ठेवण्यात आल्या आहेत. या गाड्यांवर कारवाई होतेय पण कारवाई केलेल्या गाड्या ठेवायला मुंबई पोलिसांकडे जागाच नसल्याची अवस्था आहे. दहिसर हा नवा हॉटस्पॉट तर आहेच पण मुंबईच प्रवेशद्वारही आहे. या प्रवेशद्वारावर दहिसर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईबाबत स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम एम मुजावर यांनी यासंबंधी माहिती दिली.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 5257 रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे रुग्णांचा एकूण आकडा 1,69,883 झाला आहे. तर आज 181 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या 7610 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 73298 एवढे Active रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत आज 71 जणांचा मृत्यू झाला तर 1226 नवे रुग्ण सापडले. सलग चौथ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार