सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सोमवारी रात्री चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला

पुन्हा एकदा केला घुसखोरी करण्याचा प्रयत्न

Aishwarya Dubey
  • Sep 2 2020 11:30AM

 गेल्या काही महिन्यांपासून भारत चीनदरम्यान तणावात वाढ झाली आहे. एकीकडे चर्चा करत दुसरीकडे घुसखोरीसारख्या कुरापती चीनकडून सुरू आहे. दरम्यान, २९-३० ऑगस्ट रोजी चीननं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या जवानांनी तो प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा एकदा चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. चीनच्या जवानांनी अंधाराचा फायदा घेत भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु जवानांनी योग्य प्रत्युत्तर देत त्यांचा डाव उधळला.

जेव्हा दोन देशांमधील ब्रिगेड कमांडर्स चुसुल आणि मोल्दो इथे फ्लॅग बैठक सुरू असतानाच घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ही दोन्ही सैन्य टँक आणि इतर जड शस्त्रं घेऊन एकमेकांच्या समोर उभी आहेत. ताणतणाव कमी करण्यासाठी तासनतास चाललेल्या या बैठकीचा अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही.

दरम्यान, मुजोर चीनची दादागिरी सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकवेळा केलेल्या चर्चा आणि कराराचं चीनकडून उल्लंघन होत असल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. गॅलव्हान खोऱ्यानंतर लडाखमध्ये तणाव निर्माण झाला होता. 29 ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने होतं.

 

चीननं भारतीय सीमांमध्ये पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी भारतीय सैन्यातील जवानांनी ड्रॅगनचा हा डाव उधळून लावला होता. गलवान खोऱ्यानंतर चीननं आपलं सैन्य आणि टेन्ट हलवून पैंगोग त्सो झील भागात नेण्यास सुरू केलं. चीनच्या सर्व हालचालींवर भारताची नजर होती. त्यामुळे चीन काहीतरी कुरापती करणार याची चाहूल लागल्यानं ड्रॅगनचा डाव उधळून लावण्यात यश आलं

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार