सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पत्रकार केतन रघुवंशी यांच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल; पोलिसांकडून पत्रकारितेची उघडपणे गळ्चेपी

पोलिसांकडून पत्रकारितेची उघडपणे गळ्चेपी

Sudarshan MH
  • Oct 22 2023 5:43PM
** 

नंदुरबार -  पोलिसांची बदनामी केली तसेच पोलिसांची आप्रिती पसरवली, या दोन वेगवेगळ्या आरोपाखाली नॅशनल न्युज चॅनल 'सुदर्शन न्युज'चे नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी केतन रघुवंशी यांच्यावर आज आणखी 2 वेग वेगळे गुन्हे काल दाखल करण्यात आले. यामुळे केतन रघुवंशी यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांची संख्या 20 झाली असून एखाद्या पत्रकाराला पोलिसांनी उघडपणे लक्ष बनवल्याचे हे उदाहरण बनले आहे. 

 काही दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्हा DJ मुक्त केल्याचा व महाराष्ट्रातील प्रथम आमलीपदार्थ मुक्त जिल्हा असल्याचा दावा जिल्हा पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पोलीस प्रेस नोट द्वारे केला होता. त्याच्या आधी त्यांनी माननीय पोलीस महाधिक्षक बी. जे. शेखर पाटील यांच्या उपस्थितीत केला होता. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे ते दावे पुराव्यासहित सुदर्शन न्युजने खोडून लावले व जिल्ह्यात आजही आमलीपदार्थ सर्रास विक्री व जप्त होत असल्याचे आपल्या बातमी द्वारे समोर आणले . 
त्याचा परिणाम असा की, वास्तव तसे नसल्याचा तो आरसा पोलीस प्रशासनास दाखवल्याचा राग मनात धरून आपल्या पदाचा गैरवापर करून हा गुन्हा केतन रघुवंशी वर दाखल करण्यात आला. हे दुसरे तिसरे काही नसून सरळ सरळ लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या अधिकारांचे हनन असून प्रशासनाने लोकशाहीची गळचेपी असल्याचा सूर पत्रकार वर्तुळात उमटत आहे.

'सुदर्शन न्युज' ने यापूर्वी ही अनेकदा काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचे गैरकृत्य व काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालणारे शहरातील अवैध धंदे यांचे वाभाडे काढले असून त्याचेच फलित म्हणून आजवर हेतुपुरस्पर बुद्धीने एकूण 20 वर गुन्हे नोंदवून हृद्यपारीची प्रक्रिया राबवण्यात आली आहे .

असे असले तरी सुदर्शन न्यूज टीम चा भारताच्या संविधानावर व न्यायपालिकेवर संपूर्ण भरवसा असून लोकशाहीच्या चौथा स्तंभास न्याय जरूर मिळेल, या अपेक्षेने आमचा लढा यापुढेही असाच चालू राहीन व या खोट्या केसेस व दमबाजी ला नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार अजिबात भीक घालणार नाही व आपल्या लेखनिशी प्रामाणिक राहतील हेच अभिवचन!

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार