सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एकाच मालकाच्या बनावट कंपन्यांच्या द्वारे नंदुरबार, रानाला, ढंढाने, चौपाळे शिवारात 117 एकर जमीन भूखंड माफियाच्या घश्यात, सरकारी यंत्रणा दखल घेणार की मूग (नोटा) गिळून गप बसणार

सरकारी यंत्रणा दखल घेणार की मूग (नोटा) गिळून गप बसणार

Sudarshan MH
  • Sep 27 2023 10:16AM
सुदर्शन न्युज च्या मागील खुलाशा प्रमाणे अनेक भु माफियांनी बोगस औद्योगिक कंपन्या कागदोपत्री स्थापन करून कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 63 (1) अ) प्रमाणे खरेदी केल्याचे भासऊन जिल्हा उद्योग केंद्र, नंदुरबार व तहसील कार्यालय तसेच महसूल यंत्रणा पाठशी बाळगून शेकडो एकर जमीन एक एका भूखंड माफियांनी लाटल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते , सदर जमीन बळकवण्याची पद्धत लक्षात घेता कोट्यावधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडवून करोडोंची जमीन कवडीमोल भावात आपल्या पदरात पाडून घेण्याचा जणू काही या भूमाफियांनी सपाटाच लावला आहे , सुदर्शन न्युज च्या हाती आलेल्या पुराव्या नुसार साल 2008 पासून ते आजपावेतो शहरातील एका प्रतिष्ठित भुमाफियाने स्वतःच्या व नातेवाईक तसेच पंटरांच्या नावे बोगस कागदोपत्री कंपन्या रजिस्टर करून औद्योगिक प्रयोजन हेतू कोट्यवधींची जमीन काही भ्रष्ट अधिकारीच्या संगनमताने आपल्या नावे करून ती औदयोगिक प्रयोजन हेतू न वापरता व अनुदान लाटून रहिवासी क्षेत्र म्हणून विकण्याचा धडाका लावला आहे, ज्यात 
*नंदुरबार शहर - 14 एकर
*चौपाळे शिवार -20 एकर
*ढंढाने शिवार - 9 एकर
*रनाळे शिवार - 74 एकर
असे एकूण - (117 एकर)
जमिनीची माहिती सुदर्शन न्युज ला प्राप्त झाली असून या व्यतिरिक्त ही अजून एवढीच जमीन अवैध रित्या या भुमाफियाने हडप केल्याचे संशय आहे, 
सदर कुळ कायद्याच्या जमिनी ह्या अग्रीकल्चर लॅन्ड दाखवून शासकीय पट मध्ये सुद्धा कोटी कोटी रुपयांचा महसूल बुडावल्याचे निष्पन्न झाले आहे, तसेच शासकीय नियमा प्रमाणे प्रयोजन हेतू निमित्त जमीन न वापरल्यास अथवा त्या व्यतिरिक्त इतर प्रयोजन हेतू वापरल्यास ती 5 वर्षाने शाशन जमा करण्याचा नियम असतानाही शासकीय यंत्रणा खिशात घेऊन फिरण्याचा आव आणणाऱ्या या भूमाफियाला आज पावेतो कोणतीही कार्यवाही अथवा नोटीस सुद्धा पाठवण्याचे धाडस प्रशासनाला झालेले नाही,
 पहिली बातमी लागल्या नंतर अनेक पीडितांनी व हितचिंतकांनी आमच्याशी संपर्क साधला असून लवकरच अधिक माहिती व पुरावे सुदर्शन न्युज ला प्राप्त होतील व सदर जमीन सरकार दरबारी जप्त करण्याचा आमचा मानस पूर्णत्वास येईल हीच शाशन कडून अपेक्षा
केतन रघुवंशी
सुदर्शन न्युज, नंदुरबार

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार