सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भोणेच्या महिलेची जमिन हडप करणाऱ्या आरोपींचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

आरोपींचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

Sudarshan MH
  • Sep 20 2022 7:00AM


नंदुरबार - तालुक्यातील भोणे येथील महिलेची शेती बोगस कागदपत्रांच्या आधारे हडप करून शेतीवर बॅंकेतुन कर्ज काढून घेतल्याचा प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तत्कालीन तलाठी,बॅंक मॅनेजर सह नंदुरबारच्या ७ जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी आपली अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी सादर केला होता.

 नंदुरबार शहरात गोर गरीब लोकांच्या जमिनी बोगस कागदपत्रांच्या आधारे हडप करणारे फार मोठे रॅकेट कार्यरत आहे. नंदुरबार तहसील कार्यालयात महसूल विभागाचा एक कर्मचारी आप्पा म्हणून ओळखला जातो. तो सर्व काळी गोरी कामे करतो.त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांचा तो आवडता आहे.तर अधिकाऱ्याचा लाडका आहे. वर्षानुवर्षे नंदुरबार तहसील कार्यालय बदली न होता सांभाळण्याचा रेकार्ड त्याच्या नावावर आहे. तो एका रात्रीत शासकीय कागदपत्रे गायब करु शकतो आणि शोधून आणू शकतो. ऐवढा कलाकार आदमी आहे. नंदुरबार शहर व तालुक्यात करोडोंच्या जमिनीचे घोटाळे झाले आहेत. त्या जमिनीच्या कागदपत्रांवर याच व्यक्तीचा हात असतो असं लोकं उघड उघड बोलतात. जे काम कोण करणार नाही त्या कामाचे टेंडर हा व्यक्ती घेतो.जमिनींच्या भ्रष्ट व्यवहारात त्याने करोडो रुपये छापले आहेत.पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करताना सदर व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून तपास केल्यास मोठे जमिन घोटाळे उघडकीस येतील.

याबाबत अधिक माहिती अशी की, उज्वला दिलीप जैन, दिलीप सुवालाल जैन (मयत), कृष्णा हरिभाऊ मराठे, संजय हरिभाऊ मराठे, लक्ष्मण हरिभाऊ मराठे, तत्कालीन तलाठी जाकीरखान मोहम्मदखान पठाण (सर्व रा.नंदुरबार) यांनी आपसात संगणमत करुन लिलाबाई माणिक माळी (रा.भोणे) या महिलेच्या मालकीच्या शेतजमिनीच्या मुळ दस्तावर व्हाईटनर लावुन मुळ मालकाचे नाव खोडुन बनावट नोंदी, फेरफार करून बनावट सातबारा उतारा तयार करून कुळ कायद्याची शेतजमीन आपल्या नावावर करून नंदुरबार आयडीबीआय बॅंकेचे मॅनेजर यांनी सदर जमिनीवर कर्ज मंजूर करून लिलाबाई माणिक माळी (रा.भोणे) यांची फसवणूक केली.सदर प्रकार दि.२२ जुलै २०२१ पूर्वी ते ७ सप्टेंबर दरम्यान घडला.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४२०,४६८,४७१,४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार