सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोबाईल हिसकावणारी टोळी जेरबंद ५ मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस

नंदुरबार एलसीबीची कारवाई

Sudarshan MH
  • Sep 19 2022 8:28AM




नंदुरबार - जिल्ह्यात नंदुरबार व नवापूर येथे नागरिकांच्या हातातुन जबरीने मोबाईल हिसकावून धुम स्टाईलने चोरी करणाऱ्या २ चोरट्यांना एलसीबीने ताब्यात घेतले आहे.आरोपीकडून चोरीचे मोबाईल व दुचाकी असा एकूण १ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी मोबाईल चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आणले आहे.

नंदुरबार शहरात मोटारसायकलीने आलेल्या दोन अज्ञात इसमांनी पोस्टमन,नर्स व वेल्डिंग काम करणाऱ्या कामगाराचा मोबाईल जबरीने हिसकावून पलायन केले होते. याबाबत ३ गुन्हे नंदुरबार शहर व उपनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. तर नवापूर येथे चोरट्यांनी एका मुलाच्या हातातून मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. 
सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी गुन्हा शाखेला दिले होते.दरम्यान नंदुरबार येथे सीबी पेट्रोल पंप परिसरात २अनोळखी ईसम बिल नसलेले मोबाईल कमी किंमतीत विक्री करीत असल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांना मिळाली.त्यानुसार एलसीबीच्या पथकाने सापळा रचून राहुल उर्फ सनी बाबा जितेंद्र साळवे (२४) व समीर विजय वसावे (दोन्ही रा.भिल जांबोली ता.निझर) यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून ८ मोबाईल मिळून आले. पोलिसांनी दोघांना विचारपूस केली असता त्यांनी नंदुरबार व नवापूर येथे मोटारसायकलीने नागरिकांच्या हातातुन मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल व मोटारसायकल असा एकूण १ लाख ५६ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपीसह मुद्देमाल अधिक तपासासाठी नंदुरबार शहर पोलिस यांच्या ताब्यात दिला आहे. आरोपींपैकी राहुल उर्फ सनी बाबा जितेंद्र साळवे याचेवर सुरत येथे अशाच प्रकारचे जबरी चोरीचे २ गुन्हे दाखल आहेत. गुन्हा शाखेने ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत अजुन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर कामगिरी पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील,अपर पोलिस अधीक्षक विजय पवार,उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर,सपोनि संदिप पाटील, हवालदार मुकेश तावडे,पोना मनोज नाईक, जितेंद्र ठाकूर,मोहन ढमढेरे, जितेंद्र तोरवणे,अभय राजपूत यांच्या पथकाने केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार