सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्वस्तात बांधकाम साहित्य देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास

१३ लाखांचा दंड : नंदुरबार कोर्टाचा निकाल

Sudarshan MH
  • Aug 13 2022 6:52AM
नंदुरबार - स्स्वस्तात बांधकाम साहित्य देण्याचे आमिष दाखवून एका बांधकाम ठेकेदाराची लाखों रुपयांत फसवणूक करणाऱ्या निजामपूर ता.साक्री येथील आरोपीला नंदुरबार न्यायालयाने ७ वर्षे सश्रम कारावास व १३ लाख २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.सदर निकाल मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद चव्हाण यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बांधकाम ठेकेदार चेतन वसंत धामणे (रा.शिरपूर) यांना स्वस्तात व होलसेल दरात बांधकाम साहित्य,लोखंड, सिमेंट आदिंचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून जुबेर अली युनुस अली सैय्यद (वय ३२,रा.निजापूर ता.साक्री,जि.धुळे) याने चेतन धामणे यांच्या कडून नंदुरबार येथे दि.४ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२१ दरम्यान अँडव्हान्स रक्कम म्हणून १४ लाख १३ हजार १६० रुपये उकळले.सदर पैसे घेऊन जुबेर अली याने बांधकाम मटेरियल न पुरवता फसवणूक केली.याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान सदर गुन्ह्याचा सखोल तपास करुन पोलिस उप निरीक्षक देविदास सोनवणे यांनी आरोपींविरुद्ध नंदुरबार न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद चव्हाण यांच्या समक्ष अंडर ट्रायल खटल्याची सुनावणी झाली.सर्व साक्षी, पुरावे सादर करण्यात आले.आरोपी.जुबेर अली हा दोषी आढळल्याने न्यायालयाने त्याला ७ वर्षे सश्रम कारावास व १३ लाख २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील,अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, उपनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक देविदास सोनवणे यांनी केला. सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील सुनील पाडवी यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार दिपक डुमकुळ यांनी पाहिले.या खटल्यातील यशाबद्दल तपास अधिकारी व सरकारी वकील यांचे अभिनंदन पोलिस अधीक्षक यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार