सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रनाळे येथे आदिवासी दिनाच्या रॅलीत दोन गटात हाणामारी, १० जणांवर गुन्हा

दोन गटात हाणामारी, १० जणांवर गुन्हा

Sudarshan MH
  • Aug 12 2022 6:41AM

नंदुरबार - तालुक्यातील रनाळे जागतिक आदिवासी दिनाच्या रॅलीत ट्रॅक्टरच्या वादातून दोन गटांत आपसात हाणामारी झाली.याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ९ ऑगस्ट रोजी रनाळे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त रॅली काढण्यात आली होती.यावेळी काशिनाथ नादर भिल (रा.बसस्थानक भिलाटी,रनाळे) यांच्या ट्रॅक्टरच्या बंपरला धरुन सिताराम भिल,विजय भिल,अजय भिल,रविन भिल, अनिल भिल (सर्व रा.रनाळे) हे ट्रॅक्टरवर चढत होते.असे करु नका असे समजून सांगत असताना त्याचा राग येऊन पाचही जणांनी जमाव जमवुन ग्रा.पं.कार्यालयाजवळ  काशिनाथ नादर भिल याला हाताबुक्क्यांनी व काठीने डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापती केले. तर दुसऱ्या घटनेत वरील कारणांमुळे प्रविण गोपाल भिल,काशिनाथ नादर भिल, परशुराम नादर भिल, एकनाथ काशिनाथ भिल,बुधा काशिनाथ भिल (सर्व रा.रनाळे) यांनी विजय किसन भिल (२८,रा.बसस्थानक भिलाटी,रनाळे) याला हाताबुक्क्यांनी मारहाण केली.सदर घटना ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून १० जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार