सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पाझर तलावात बुडून एकाचा मृत्यू मोठे कडवान येथील घटना

बुडून एकाचा मृत्यू मोठे कडवान येथील घटना

Sudarshan MH
  • Aug 9 2022 8:25AM


विसरवाडी - नवापूर तालुक्यातील मोठे कडवान येथील पाझर तलावात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोठे कडवान येथील अर्जुन वाघीरे (वय ५५) हे ७ ऑगस्ट रोजी रविवारी सायंकाळी गावातील पाझर तलावात आंघोळीसाठी गेले असता ते पाण्यात बुडाल्याने गावकऱ्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ते मिळून आले नाही.दरम्यान ८ ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आला.सदर घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र वळवी,पोना राजु कोकणी, देवेंद्र अहिरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला.याप्रकरणी मयताचा मुलगा मुलामजी अर्जुन वाघिरे यांनी दिलेल्या खबरीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार