सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गुजरातेत टेम्पो मधून अफूची अवैध तस्करी अक्कलकुवा येथे साडे तेरा लाखांचा अफू जप्त

अक्कलकुवा येथे साडे तेरा लाखांचा अफू जप्त

Sudarshan MH
  • Aug 5 2022 3:47PM


अक्कलकुवा - येथे अंकलेश्वर -ब-हाणपूर महामार्गावर दि.३ ऑगस्ट रोजी सायंकाळी अक्कलकुवा पोलिसांनी धडक कारवाई करुन १३ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा अफूचा चुरा भरलेल्या गोण्या एका टेम्पो मधून जप्त केले आहे.सदर अफूची तस्करी अक्कलकुवा मार्गे गुजरातेत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा मार्गे एका टेम्पो मधून अफूची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांना मिळाली.पोलिस अधीक्षक यांनी अक्कलकुवा पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार पोलिसांनी दि.३ ऑगस्ट रोजी सायंकाळी तळोदा नाका येथे सापळा रचून संशयित टाटा टेम्पोला थांबवून चालकाकडे पोलिसांनी कागदपत्रे मागितली असता त्याने पाणी पिके आता हुं.. फिर कागज दिखाता हू.. असे सांगून तो पाणी पिण्यासाठी गेला असता तो परत आला नाही.दरम्यान पोलिसांनी सदर टेम्पोची तपासणी केली असता गहू आणि मक्याच्या भुश्याच्या आड १८गोण्या मध्ये सुमारे १३ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा अफुचा चुरा भरलेला मिळून आला.पोलिसांनी टेम्पो सह अफूचा चुरा जप्त करुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील,उप विभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मन्साराम आगरकर, सहायक पोलिस निरीक्षक राजेश गावीत, पोलिस उप निरीक्षक रितेश राऊत, जितेंद्र महाजन, देविदास वडघुले, हवालदार कपिल बोरसे, आदिनाथ गोसावी, देविदास विसपुते,अजय पवार, संदिप महाले, अमरसिंग पाडवी, दिनेश लाडकर, संजय रामोळे, चेतन चौधरी यांच्या पथकाने केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार