सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

धुळे शहरात मध्यवर्ती बसस्थाकालगत असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली आहे,

Nandurbar. MH
  • May 27 2022 4:42PM
*सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन*

नंदुरबार, दि.27 (जिमाका वृत्तसेवा): धुळे शहरात मध्यवर्ती बसस्थाकालगत असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली आहे, असे जिल्हा सैनिक अधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

या वसतिगृहात आजी-माजी सैनिकांच्या आठवीपासून पुढील अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक शुल्क आकारुन प्रवेश दिला जातो. या वसतिगृहात निवास, भोजन, 24 तास पाण्याची व्यवस्था, वायफाय, जिम, पुस्तकालय व मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. वसतिगृहात कार्यरत कर्मचारी मुख्यत्वे सैनिकी सेवेतून सेवा निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शिस्तीविषयी मार्गदर्शन केले जाते. 

सन 2022-2023 मध्ये आठवी वा पुढील शिक्षण घेत असलेल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील  माजी सैनिक, दिवंगत सैनिक, माजी सैनिकाच्या विधवा पत्नींनी त्यांच्या पाल्यांसाठी या वसतिगृहाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02562-237607,237264 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी, संजय गायकवाड यांनी केले आहे.
0000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार