सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

30 सेकंदात परिसर होणार कोरोना मुक्त

• अत्युल्य मायक्रोवेव्ह चे माननीय केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांचे हस्ते लोकार्पण. • खासदार पदमश्री डॉ. विकास महात्मे यांचा पुढाकार

Snehal Joshi .
  • Aug 11 2020 8:21PM
आता कुठलाही परिसर, पृष्ठभाग, वस्तू, घरातील, ऑफिस मधील फर्निचर, बेड ई. सर्वच केवळ 30 सेकंदात कोरोना आणि इतर व्हायरस मुक्त तसेच बॅक्टेरिया मुक्त केल्या जाऊ शकेल. ‘मेसर टेक्नोलॉजी’ द्वारा निर्मित, ‘अतूल्य मायक्रोवेव्ह’ हे जगातील पहिले हाती धरून वापरता येणारे उपकरण आहे जे मायक्रोवेव्ह द्वारे तात्काळ निर्जंतुकीकरण करू शकेल. राष्ट्रीय संस्था DRDO द्वारा प्रमाणित तसेच फ्रांस व अमेरिकेच्या निकषांवर आधारित असे हे उपकरण 100 टक्के भारतीय बनावटीचे असून MSME अंतर्गत बनविले आहे. मुख्य म्हणजे ही यंत्रणा मानवासाठी अगदी सुरक्षित असून अल्ट्राव्हायोलेट किरणांसारखे याचे दुष्परिणाम नाहीत. तसेच ‘अतुल्य’ मध्ये पाणी अथवा रसायनांचा वापर नाही त्यामुळे अतिशय सोयीस्कर व टिकावू आहे. या उपकरणा द्वारे 5 मीटर पर्यंतचा परिसर, पृष्ठभाग, वस्तू , इतकेच नव्हे तर खोके आणि डब्यांच्या आतील वस्तू देखील निर्जंतुक करता येऊ शकतात. हे उपकरण बनवतांना खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी पुढाकार घेतला व सल्लागार म्हणून काम केले. मेसर टेक्नोलॉजी चे श्री मोनिष भंडारी व त्यांच्या चमूने संशोधन करून हे उपकरण बनविले. मा.श्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, परिवहन, महामार्ग, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्यम विभाग भारत सरकार यांनी हे उपकरण आज लोकार्पण केले. त्यावेळी खा.डॉ.विकास महात्मे , शिवानी दाणी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार