सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी इ.स.१८३१ मध्ये नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. इ.स. १८४० साली सावित्रीबाईंचा विवाह जोतिराव फुले यांच्याशी झाला.

निलेशकुमार इंगोले ९३७११४५१९५
  • Jan 2 2021 10:35PM
स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळावा व स्त्रियांना समाजात आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या सावित्रीबाई फुले या आपल्या कर्तृत्वाने युगप्रवर्तक स्त्री ठरल्या. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील स्त्री-सन्मानासाठी व उपेक्षित माणसांची सेवा करण्यात व्यतीत केले. त्यांनी आपल्या जीवनात आदर्श पत्नी, पहिली भारतीय स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका, समाजसेविका, कवयित्री अशा अनेक महत्वपूर्ण भूमिका यशस्वीरीत्या पार पाडल्या. अशा या महान स्त्रीचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी इ.स.१८३१ मध्ये नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. इ.स. १८४० साली सावित्रीबाईंचा विवाह जोतिराव फुले यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय केवळ ९ वर्षे तर जोतिरावांचे वय अवघे १३ वर्षांचे होते. आपला संसार करत असतांना जोतीरावांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांनी कार्य केले. जोतिरावांनी उभारलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात सावित्रीबाईंचा मोलाचा वाटा होता. त्यांनी केवळ स्वतःच्या संसारात न रमता जोतीरावांच्या बरोबरीने समाजोन्नतीच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. जोतिरावांच्या मृत्यूनंतरही सावित्रीबाईंनी धाडसाने जे कार्य केले ते तितकेच प्रेरणादायी आहे. भारतवर्षाला धर्मशास्त्रातील जात, वर्ण, लिंग विषमतेचा कलंक आहे. त्यामुळेच भारतीय स्त्रीला हजारो वर्षे शिक्षणाची दारे बंद होती. धर्मग्रंथाचा त्याला आधार होता. या धर्मशास्त्राच्या अभेद्य भिंती फोडून ज्ञानाचा प्रकाश भारतीय स्त्रीच्या अंगणात आणण्याचे ऐतिहासिक कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. जोतिरावांनी स्त्री शिक्षणाचा पाया घालून फक्त स्त्रियांसाठीच नव्हे, तर शूद्रातिशूद्रांसाठी ज्ञानगंगा खुली करून दिली. याच ज्ञानगंगेचा लाभ सर्व स्त्रीजातीला होण्यासाठी केलेले त्यांचे शैक्षणिक योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्ञान फार मोठी शक्ती असून स्त्रिया आणि दलित-बहुजन वर्गाची उन्नति ज्ञानाशिवाय होऊ शकणार नाही. हे ओळखून प्रत्यक्ष शिक्षण प्रचाराच्या कार्याला त्यांनी स्वतःला आयुष्यभर वाहून घेतले. संपूर्ण देशात मुलींची शाळा आणि नेटिव्ह लायब्ररी सर्वप्रथम सुरू करण्याचे श्रेय जोतिराव आणि सावित्रीबाई यांचेच आहे. स्त्रियांची गुलामगिरीतून मुक्तता व्हावी यासाठी दोन हजार वर्षात अनेक अयशस्वी प्रयत्न झाले. पण स्त्रियांना खऱ्या अर्थाने बंधमुक्त करून त्यांच्या जीवनाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम १९ व्या शतकात महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यांच्यामुळेच भारतीय महिलांना शिक्षणाची संधी मिळाली. सावित्रीबाईमुळेच शैक्षणिक क्रांतीचा श्रीगणेशा झाला. समाजातले स्त्रीदास्यत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून-सवरुन स्वावलंबी बनावे म्हणजे त्यांना आपल्या खर्‍या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही असे ठाम मत त्यांनी मांडले. शैक्षणिक कार्याबरोबरच सावित्रीबाईंनी सामाजिक समस्या, अन्यायाला वाचा फोडली. केशवपनाची किंवा संन्यास दिक्षेची पद्धत बंद करण्यासाठी देशातील पहिला अहिंसक मार्ग स्वीकारला. मानवी भावनांना साद घालणारा संप घडवून आणला. अवघ्या प्राणिमात्रांसाठी जीवन म्हणजे पाणी अस्पृश्य म्हणून आपल्याच काही बांधवांना भीक म्हणून मागावे लागत होते. त्यांच्याकरिता स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद खुला करून निखळ मानवतेचे दर्शन घडविले. या सर्व कार्याहून अवघड आणि नाजूक कार्य म्हणजे बालविधवांना मानसिक आधार देऊन स्वगृही त्यांचा आणि निरपराध बालकांचा जीव वाचावा म्हणून जननिंदेची तमा न बाळगता स्वतः शारीरिक, मानसिक, आर्थिक झळ सोसून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले व यशस्वीपणे चालविले. जाती-पातीच्या बंधनांना तोडून अत्यंत सहृदयतेने एका विधवेच्या अनाथ मुलाला यशवंतला दत्तक पुत्र म्हणून स्वीकारले. एवढ्यावरच न थांबता स्वपुत्राचे सर्व अधिकार आणि प्रेम, वात्सल्य त्याला दिले. सत्यशोधक समाजाच्या कार्यात अगदी सुरुवातीपासून सक्रिय सहभाग घेऊन अगदी जोतिरावानंतरही सत्यशोधक समाजाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तळागाळातील लोकांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे, दुष्काळग्रस्तांसाठी मदत मिळवून देणे, अन्नछत्र उघडणे, अन्नछत्रात जातीने लक्ष घालून स्वतः कार्य करणे लोकांना धीर देणे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जागृत करणे, आत्मसन्मानाची जाणीव करून देणे अशा अनेक सामाजिक कार्यात सावित्रीबाईंनी उल्लेखनीय कार्य केले. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत समाजहिताचा विचार करून आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांनी प्लेगच्या साथीत अतुलनीय कार्य करून रणांगणावर रणमर्दीनीप्रमाने प्रमाणे कार्य करता-करता देहत्याग केला. त्यांच्या अनमोल कार्याला शतशः सलाम.    

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार