सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोनाची 3 नवी लक्षणं आली समोर

कोरोनाची काही नवीन लक्षण समोर आल्यामुळे आरोग्य विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 29 2020 8:36AM

देशात कोरोनाचा (coronavirus) हाहाकार वाढत आहे. रोज कोरोना रुग्णांचे आकडे रेकॉर्ड ब्रेक करत आहेत. भारतात 5.28 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. पण या सगळ्यात, कोरोनाची काही नवीन लक्षण समोर आल्यामुळे आरोग्य विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. ताप, श्वास घेण्यात त्रास, कोरडा खोकला आणि थकवा यासारखे शारीरिक बदल झाले की ही कोरोनाची लक्षणं आहेत हेच आतापर्यंत सगळ्यांना माहिती होतं. परंतु अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या वैद्यकीय संस्थेनं तीन नवीन कोरोनाची लक्षणं समोर आणली आहे. पावसाळ्यात भारतात ही लक्षण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

या अमेरिकेच्या कंपनीच्या म्हणण्यानुसार, वाहणारं नाक, मळमळ आणि जुलाब होणं हीदेखील कोरोनाची लक्षणं असल्याचं सांगण्यात आलं आहे. अशी लक्षण तुम्हाला दिसली तर तात्काळ रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला या संस्थेकडून देण्यात आला आहे.

याआधी वाहती सर्दी म्हणजे कोरोनाची लक्षण नाही असं समजलं होतं. पण अलीकडेच कोरोना रूग्णांच्या लक्षणांमुळे असं दिसून आलं की जर एखाद्या व्यक्तीला वाहती सर्दी आणि अस्वस्थता वाटत असेल तर त्याला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. जरी त्याला ताप येत नसेल.

मळमळ होणे

वारंवार होणाऱ्या मळमळीकडे दुर्लक्ष करू नका. ते धोकादायक ठरू शकतं. अशा व्यक्तीस त्वरित अलग केलं जावं. पावसाळ्याच्या बदलामुळे अनेकांना मळमळ वाटणं सामान्य आहे, पण कोरोना महामारीच्या या युगात त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा परिस्थितीत कोरोना तपासणी त्वरित करावी.

कोरोना रूग्णांना होतायत जुलाब

कोरोना रूग्णांमध्ये जुलाब होणं हे एक नवीन लक्षण समोल आलं आहे. कोरोना-संक्रमित रुग्णांना जुलाबसारखी लक्षणंदेखील असल्याचं डॉक्टरांनी यापूर्वी सांगितलं होतं. त्यामुळे जुलाब आणि शरीरात काही इतर गोष्टी विचित्र जाणवल्या तर कोरोनाची चाचणी करणं आवश्यक आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार