सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नागपूर शहरात एका सेंट्रल जेल चे दोन जेल होणार*

कोरोनाचा काळात जेलमधील कैद्यांची संख्या पाहता, शहरात आणखी एक कारागृह तयार करण्यात येत आहे.

Snehal Joshi
  • Jun 16 2020 11:50PM
नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये महाराष्ट्रातच नाही. तर इतरही राज्यांचे काही कैदी नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये आहेत .कोरोनाचा काळात जेलमधील कैद्यांची संख्या पाहता, शहरात आणखी एक कारागृह तयार करण्यात येत आहे.सेंट्रल जेल च्या जवळच असलेल्या अजनी परिसरातील एका शाळेला कारागृह करण्यात येणार आहे. हे कारागृह तात्पुरत्या स्वरूपाचे राहणार असून, नवे कैदी इथे ठेवण्यात येणार आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. शहरात हा आकडा आता हजारांच्या पार झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे सरकारचे आदेश आहेत. उद्योग, व्यवसाय सुरू करताना याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होते आहे.कारागृहातील संख्या पाहता अनेक कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. नागपूरमध्ये मध्यवर्ती कारागृह इंग्रजांच्या काळापासून आहे. कारागृहात कैद्यांना ठेवण्यासाठी तीन ते चार बॅरेक आहेत. यात हजारोंच्या संख्येने कैदी आहेत. येथील पोलिस कर्मचारी, कैदी, न्यायालयीन बंदींना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. लॉकडाउन उठवल्यानंतर गुन्ह्यांच्या घटनात वाढ झाली. चोरी, खुनाच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांकडून आरोपींना पकडण्यात येत असून, यातील अनेकांना न्यायालयीन कोठडी पाठविण्यात येते. यामुळे कारागृहातील कैद्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी ही संख्या जास्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून नवीन कारागृहाची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी अजनी भागातील एका शाळेचे कारागृह होणार असल्याची माहिती मिळाली असून. सत्र सुरू होईपर्यंत येथे कैद्यांना ठेवण्यात येणार असल्याचे समजले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार