सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निवृत्त आयएएस अधिकारी नीला सत्यनारायण यांचे कोव्हिड19 मुळे निधन झाले

निवृत्त आयएएस अधिकारी नीला सत्यनारायण (Neela Satyanarayan) यांचे कोव्हिड19 (COVID-19) मुळे निधन झाले आहे. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

Aishwarya Dubey
  • Jul 16 2020 12:55PM

कोरोनाचा विळखा देशभरात वाढू लागला आहे. कोरोनामुळे देशभरात अनेकानी प्राण गमावले आहेत. दरम्यान निवृत्त आयएएस अधिकारी नीला सत्यनारायण (Neela Satyanarayan) यांचे कोव्हिड19 (COVID-19) मुळे निधन झाले आहे. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यात त्यांना या रुग्णालयात भरती करण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे सत्यनारायण यांचे निधन झाले.

मंत्रालयात त्यांनी वेगवेगळ्या पदावर सचिव म्हणून काम केले आहे. त्या महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव देखील होत्या. त्यांच्याकडे काही काळासाठी राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी देखील होती. 2009मध्ये त्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त (First Woman State Election Commissioner) होण्याचा बहुमान मिळाला होता. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नीला सत्यनारायण या 1972 च्या सनदी अधिकारी होत्या. एक शिस्तीच्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचं काम वाखाणण्याजोगे होते. 05 जुलै 2014 रोजी त्यांनी निवृत्ती स्विकारली.

 

 

 

 

 

 

 

 

राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे. त्या उत्तम कवयित्री होत्या, तसंच साहित्याच्या माध्यमातून त्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. यांसारख्या अनेक आठवणींना राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी उजाळा दिला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार