सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आतापर्यंत एक कोटींपेक्षा अधिक लोकांना शिवभोजन थाळीचा लाभ

योजना ठरतेय गरीबांसाठी वरदान, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 30 2020 3:24PM

गोरगरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. २६ जानेवारी २०२० पासून आतापर्यंत १ कोटी ८७० थाळ्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच या योजनेने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचेही ते म्हणाले.

राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत ८४८ केंद्रे कार्यरत आहेत. दरम्यान, या योजनेचा विस्तार करून ही योजना तालुकास्तरापर्यंत राबविण्यास सुरूवात झाली आहे. जानेवारी महिन्यात ७९ हजार ९१८, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६७ हजार ८६९, मार्च महिन्यात ५ लाख ७८ हजार ०३१, एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ०४० आणि जुन महिन्यात २९ जून पर्यंत २९ लाख ९१ हजार ७५५ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यंत्रणेचे कौतुक

या अडचणीच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अतिशय सुयोग्य पद्धतीने योजनेचे सनियंत्रण आणि व्यवस्थापन केल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागाच्या सर्व कर्मचारी-अधिकारी वर्गाचे, शिवभोजन केंद्राच्या चालकांचं कौतूक केलं आहे.

केंद्राची स्वछता

शिवभोजन केंद्र चालकांनादेखील करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आलं आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार