सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

दर पुनरावृत्तीचा ८२ दिवसांचा अवधी तेल कंपन्यांनी संपुष्टात आणला

Aishwarya Dubey
  • Jun 14 2020 2:26PM

आज (दि.१४) पुन्हा इंधनाची दरवाढ झाली आहे, त्यामुळे पेट्रोल ०.६२ रुपयांनी तर डिझेल ०.६४ रुपयांनी वाढले आहे. सलग आठव्या दिवशी ही दरवाढ झाली आहे. यामुळे दिल्लीतील आजचा पेट्रोलचा दर हा ७५.७८ रुपये तर डिझेलचा दर ७४.०३ रुपये इतका झाला आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ८२.१० रुपये आणि डिझेलचा दर ७२.०३ रुपये इतका झाला आहे

शनिवारी पेट्रोलच्या दरात ५९ पैशांनी वाढ झाली होती. तर डिझेलच्या दरात ५८ पैशांनी वाढ झाली होती. तेल कंपन्यांनी सलग सातव्या दिवशी किरकोळ दर समायोजित केले आणि दर पुनरावृत्तीचा ८२ दिवसांचा अवधी संपुष्टात आणला आहे.

लॉकडाउनच्या काळात ८२ दिवस तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कुठलाच बदल केला नव्हता त्यामुळे आता या कंपन्यांनी सलग आठ दिवस इंधन दरवाढ केल्याचे सांगितले जात आहे. तेल कंपन्यांनी केलेल्या या इंधन दरवाढीमुळे देशभरात सर्वत्रच ही दरवाढ होत आहे. मात्र, विविध राज्यांप्रमाणे त्याच्या दरात फरक पडतो. कारण, संबंधित राज्यांतील पेट्रोलवरील स्थानिक कर किंवा व्हॅट किती आहे? त्यावर तो अवलंबून असतो.

सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त अर्थसहाय्य वाढविण्यासाठी उत्पादन शुल्क वाढवल्यानंतर मार्चच्या मध्यातच इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते.

देशातील चार महानगरांमधील आजचे दर

  1. दिल्ली – पेट्रोल (७५.१६), डिझेल (७३.३९)
  2. मुंबई – पेट्रोल (८२.१०), डिझेल (७२.०३)
  3. कोलकाता – पेट्रोल (७७.०५), डिझेल (६९.२३)
  4. चेन्नई – पेट्रोल (७८.९९), डिझेल (७१.६४)


राज्यातील प्रमुख शहरांतील आजचे दर

  1. पुणे – पेट्रोल (८१.८६), डिझेल (७०.७३)
  2. नागपूर – पेट्रोल (८२.६१), डिझेल (७२.५९)
  3. नाशिक – पेट्रोल (८२.४९), डिझेल (७१.३५)
  4. औरंगाबाद – पेट्रोल (८३.१८), डिझेल (७३.१

 

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार