सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आषाढीवारी तील दिंडी, पालखीसाठी शासनाने हे केले अनिवार्य...

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच पंढरपूरचे पांडुरंग..  आषाढी महिन्यात पंढरपूरला पालखी आणि वारीची  महाराष्ट्राची परंपरा आहे...  मात्र करोना मुळे पुढे वारी  कशी  घडेल याकडे अवघ्या वारकऱ्यांची नजर लागली आहे.

स्नेहल जोशी
  • May 16 2020 9:55AM

 अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच पंढरपूरचे पांडुरंग..  आषाढी महिन्यात पंढरपूरला पालखी आणि वारीची  महाराष्ट्राची परंपरा आहे...  मात्र करोना मुळे पुढे वारी  कशी  घडेल याकडे अवघ्या वारकऱ्यांची नजर लागली आहे. 

 आता आषाढी वारीसाठी पंढरपूर कडे दिंडी किंवा पालखी प्रयान साठी शासनाची पूर्व परवानगी आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी काल शुक्रवारी स्पष्ट केले..  उपमुख्यमंत्री म्हणाले राज्यातील विविध भागातून आषाढी वारीसाठी दिंडी निघत असतात.  त्याकरिता शासनाची पूर्वपरवानगी असणे अनिवार्य आहे. असे काल  पुण्यातील बैठकीत  ठरले होते.
 मात्र  कोरोनाचा  पार्श्वभूमीवर पंढरपूरची वारी होईल की नाही यात संभ्रम आहे. पंढरपूरच्या   नगराध्यक्षा साधना भोसले यांनी कोरोनाची परिस्थिती पाहता शासनाने पंढरपूरकरांचा विचार करून निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली. मंदिर समितीचे सहअध्यक्ष  औसेकर महाराज यांनी शासनाने सरासर विचार करून निर्णय द्यावा, त्याला मंदिर समिती बांधील राहील असे मत मांडले. या सर्वांची भूमिका ऐकून पवार यांनी वारीला अजून 45 दिवस वेळ आहे. आता कुठलाही निर्णय घेणे घाईचे ठरेल. करोना ची पुढील परिस्थिती काय असेल हे पाहून आपण निर्णय घेऊ असे नमूद केले. आषाढी बाबत 30 मे किंवा 3 जून रोजी पुढील बैठक घेऊ आणि त्यात अंतिम निर्णय घेऊ असे सांगितले.

 विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.. या बैठकीत आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, पोलीस आयुक्त डॉ. के वेंकटेशंम,  , जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपुर चे सदस्य, सचिव विठ्ठल जोशी, देहू  देवस्थानाचे प्रमुख मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानाचे विश्वस्त अंड. विश्वास ढगे पाटील, राजाभाऊ चोपदार आणि इतर मान्यवर  सोशल डिस्टन्स ठेउन  उपस्थित होते..

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार