सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्री ठाकरे बिनविरोधच विधान परिषदेवर...भाजपची एक जागा वाढली..

अविरोध निवडून आलेले उमेदवार... गोपीचंद पडवळ प्रवीण दटके रंजीत सिंह मोहिते-पाटील रमेश कराड (भाजप) उद्धव ठाकरे, डॉ. नीलम गोऱ्हे, ( शिवसेना) शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी( रा काँ) आणि राजेश राठोड( काँग्रेस)

Sudarshan MH
  • May 15 2020 10:47AM

स्नेहल जोशी  15/5/2020
----------------------------------- नागपूर --- राज्य विधान परिषदेवर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली यामुळे एकूण 20 मेपर्यंत विधानमंडळाच्या विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होण्याची अट त्यांनी पूर्ण केली आहे.. त्यामुळे टांगणीवर लागलेले त्यांचे  मुख्यमंत्रीपद अबाधित राहिले आहे.  यंदाची ही निवडणूक  बिनविरोध करताना सत्ताधारी महा विकास आघाडीने भाजपाला एक जागा जास्त सोडली त्यामुळे तीन सदस्य निवृत्त झाले असताना, भाजपला चार  जागा मिळवण्यात यश आले आहे..
 राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांनी ठाकरे यांची विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करावी अशी शिफारस  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंडळाच्या दोन बैठकी मधून करण्यात आली होती. परंतु राज्यपालांनी त्यावर निर्णय  घेतला नाही. त्यानंतर  घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोरोना  चा  पार्श्वभूमीवर प्रशासनाने विधान परिषदेची निवडणूक घ्यायला तयार असल्याचे निवडणूक आयोगाला कळवले.  शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांकडे जाऊन त्यांना निवडून आयोगाला विधान परिषद निवडणूक घेण्याची विनंती केली. परिणामी राज्यपालांनी तशी विनंती निवडणूक आयोगाला केली. आणि आयोगाने 21 मे रोजी ही द्विवार्षिक निवडणूक घेण्याचे जाहीर केले.

 एप्रिल महिन्यात डॉक्टर नीलम गोरे यांच्यासह विधान परिषदेवर 9 जागा रिक्त झाल्या होत्या. त्यात  शिवसेनेची एक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या प्रत्येकी तीन. काँग्रेसच्या दोन जागा रिक्त झालेल्या होत्या आता शिवसेना व राकॉला  प्रत्येकी दोन, तर काँग्रेसला एक जागा मिळाली आहे भाजपकडे चार जागा  मिळाली व भाजपकडे चार  जागा आल्या आहेत.

 या निवडणुकीसाठी 9 जागांसाठी 14 उमेदवार आले. उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यापैकी शहबाज राठोड या अपक्ष उमेदवारांचा अर्ज छाननीत बाद झाला. उरलेल्या 13 उमेदवारांपैकी चौघांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. अशी माहिती मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाने दिली. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अखेरच्या संध्याकाळी डॉ. अजित गोपछडे, संदीप लेले, राकॉचे  किरण पावस्कर आणि शिवाजीराव    या चार उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार