सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जगभरात सुरू असलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्यावर मोठी जबाबदारी

कोरोनाच्या लढाईत भारताने केलेल्या कामाचं कौतुक जागतिक स्तरावर केलं जात आहे. भारतानं कोरोनाला रोखण्यासाठी उचलेल्या पावलामुळे जगालाही मदत झाली आहे. याचेच फलित म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे

Aishwarya Dubey
  • May 20 2020 9:30AM

 कोरोनाच्या लढाईत भारताने केलेल्या कामाचं कौतुक जागतिक स्तरावर केलं जात आहे. भारतानं कोरोनाला रोखण्यासाठी उचलेल्या पावलामुळे जगालाही मदत झाली आहे. याचेच फलित म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे. हर्षवर्धन 22 मे रोजी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळते.

हर्षवर्धन यांची जपानचे डॉक्टर हिरोकी नकाटानी यांच्या जागी नियुक्ती करण्यात येणार आहे. सध्या 34 सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या बोर्डाचे ते अध्यक्ष आहेत. अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, मंगळवारी 194 देशांच्या जागतिक आरोग्य सभेमध्ये भारताला कार्यकारी मंडळात नियुक्त कऱण्याबाबतच्या प्रस्तावावर सह्या झाल्या. जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण पूर्व आशिया समुहाने गेल्या वर्षी सर्वानुमते निर्णय घेतला होता की, भारताला तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर निवडलं जावं.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हर्षवर्धन यांची निवड 22 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीत होईल. क्षेत्रीय गटांमध्ये अध्यक्ष पद एक वर्षासाठी दिलं जातं. गेल्या वर्षी हे ठरवण्यात आलं होतं. येत्या शुक्रवारपासून यातील पहिलं वर्ष सुरू होणार असून यासाठी भारताचा प्रतिनिधी कार्यकारी बोर्डाचा अध्यक्ष असणार आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, पूर्णकाळासाठी नसून त्यांना कार्यकारी बोर्डच्या बैठकींमध्ये अध्यक्षता करण्याची आवश्यकता असेल. बोर्डा वर्षातून किमान दोन बैठका घेते. मुख्य बैठक जानेवारीमध्ये होते. आरोग्य सभेनंतर मे महिन्यात आणखी एक लहान बैठक होते. कार्यकारी बोर्डाच्या अध्यक्षांचे मुख्य काम आरोग्य सभेचे निर्णय आणि निती तयार करण्यासाठी सल्ला देणं हे असतं.

सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 73 व्या जागतिक आरोग्य सभेत हर्षवर्धन यांनी सांगितलं की, कोरोना साथीचा सामना करण्यासाठी वेळेत सर्व आवश्यक ती पावले उचलली. तसंच कोरोनाला रोखण्यासाठी चांगली कामगिरी केली असून पुढच्या काही महिन्यात आणखी चांगलं करू असा विश्वासही दर्शवला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार